वाडी पोलिसांची धडक कारवाई: घरफोडीचे २ गुन्हे उघडकीस, दोघे गजाआड

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

नागपूर शहरातील वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी धडक कारवाई करत घरफोडीचे २ गुन्हे उघडकीस आणले आहेत.

घटनेचा संक्षिप्त तपशील:



  • पहिली घटना (कॅटरिंग साहित्याची चोरी):

    • फिर्यादी: सौ. यशोदा मनोहर पाटील (वय ४६ वर्षे, रा. दवलामेटी, वाडी, नागपूर).



    • प्रकरण: फिर्यादींचा कॅटरिंगचा व्यवसाय आहे. त्यांच्या शेजारी राहणारे ठेकेदार कुंवरसिंग राणा यांच्या विनंतीवरून त्यांनी लेबरला राहण्यासाठी आपल्या घरातील एक खोली दिली होती.

    • चोरी: खोलीत राहणारा लेबर राधेशाम बस्ताराम कोहरे (वय ४५ वर्षे, रा. दधीया, वाराशिवनी, जि. बाळाघाट, मध्य प्रदेश) याने २३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १:३० वाजेपूर्वी फिर्यादीच्या दुसऱ्या रूममधील कॅटरिंगचे सामान चोरून नेले व वडधामना येथील एका व्यक्तीस विकले.



    • पोलिस कारवाई: वाडी पोलिसांनी आरोपी राधेशाम कोहरे यास अटक केली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून रु. ५८,०००/- किमतीचा चोरीचा मुद्देमाल (ॲल्युमिनियमचे १३ मोठे गंंज, झाकण्या, कुकर) आरोपी क्र. २ सरफराज ईनायतुल्ला सवारे (वय २३ वर्षे, रा. खैरी पन्नासे, हिंगणा, जि. नागपूर) याच्या ताब्यातून जप्त करण्यात आला.

  • दुसरी घटना (हार्डवेअर दुकानाची चोरी):



    • अधिक चौकशीदरम्यान आरोपीने मार्च २०२६ मध्ये खडगाव रोडवरील माऊली नगर येथील आफरीन ट्रेडर्स हार्डवेअर दुकानाचा कोंडा तोडून हार्डवेअर साहित्याची चोरी केल्याची कबुली दिली. हे सामान त्याने एका कबाडीवाल्याला विकले होते. या प्रकरणी वाडी पोलिसांत १८ मार्च २०२६ रोजी कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१(४) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल होता.

तपास पथक:

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी पोलीस उप आयुक्त सिंगा रेड्डी ऋषिकेश रेड्डी  आणि सहाय्यक पोलीस आयुक्त  यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन मगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल धुरट, पोहवा. नागेश्वर दासरवार, विजय वायदुडे, राहुल नागदेवे, चंद्रकुमार टेकाम व पोअं. दिलीप बाजड यांनी केली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!