अमरावती: सराईत गुन्हेगार निक्कू गायकवाड MPDA कायद्यान्वये स्थानबद्ध; मध्यवर्ती कारागृहात रवानगी

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अमरावती पोलीस आयुक्तालयाची मोठी कारवाई: १६ गंभीर गुन्ह्यांतील सराईत आरोपी निक्कू गायकवाड MPDA अंतर्गत अमरावती मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध

अमरावती: आगामी सार्वजनिक उत्सव व सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाने शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत व कुख्यात गुन्हेगार निखील उर्फ निक्कु राजु गायकवाड (वय २४ वर्ष, रा. महेंद्र कॉलनी, अमरावती) याच्यावर ‘एम.पी.डी.ए.’ (MPDA) कायद्यान्वये कठोर कारवाई करत त्याला अमरावती मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.



तब्बल १६ गंभीर गुन्ह्यांची नोंद पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निक्कू गायकवाड हा सन २०२३ पासून गुन्हेगारी क्षेत्रात सातत्याने सक्रिय आहे. त्याच्याविरोधात गाडगेनगर पोलीस ठाण्यात अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये मुख्यत्वे:

  • दरोडा, दरोड्याची तयारी करणे, आणि घरफोडी (गृह अतिक्रमण)



  • जबरी चोरी, अपहरण आणि लैंगिक अत्याचार (पॉक्सो – POCSO)

  • विवाह व इतर सक्तीसाठी स्त्रीचे अपहरण किंवा प्रलोभन देणे



  • अश्लील कृती करणे, विनयभंग करून पाठलाग करणे

  • बेकायदेशीर घातक शस्त्रे बाळगणे



  • शांतता भंग करणे, अश्लील शिवीगाळ करणे, मालमत्तेचे नुकसान करणे व ठार मारण्याची धमकी देणे

त्याच्यावर यापूर्वीही प्रतिबंधात्मक कारवाई आणि तडीपारीचे आदेश देण्यात आले होते. मात्र, तडीपारीच्या आदेशांचे उल्लंघन करून तो शहरात पुन्हा गुन्हेगारी कारवाया करत असल्याचे निष्पन्न झाले.

अशी झाली कायदेशीर प्रक्रिया व कारवाई

आरोपीच्या गुन्हेगारी कारवायांचा आलेख लक्षात घेता, गाडगेनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश ब्राम्हणे आणि पोलीस उपायुक्त (परिमंडळ-१) यशवंत सोळंके यांनी गोपनीय प्रस्ताव तयार केला.

हा प्रस्ताव गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल वर, पोलीस उपायुक्त (मुख्यालय) प्रांजली सोनवणे आणि एम.पी.डी.ए. सेलचे अधिकारी सपोनि इम्रान नायकवडे, पोउपनि अजय मिश्रा, पोलीस अंमलदार चेतन कराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आला. सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे अमरावती शहराचे पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी ३१ ऑगस्ट २०२६ रोजी निक्कू गायकवाडविरुद्ध स्थानबद्धतेचे आदेश पारित केले.

कारागृहात रवानगी आणि पोलिसांचा इशारा

आदेश प्राप्त होताच गाडगेनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव, डी.बी. पथकातील पोउपनि सागर ठाकरे, पोहेकॉ विनोद इंगळे, सचिन मोहोड व पथकातील अंमलदारांनी शोध घेऊन आरोपीला ताब्यात घेतले. त्याला आदेश तामील करून ३१ ऑगस्ट २०२६ रोजी अमरावती मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्धतेच्या कालावधीसाठी दाखल करण्यात आले.

पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी स्पष्ट केले आहे की, शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अशा सराईत व उपद्रवी गुन्हेगारांची माहिती संकलित केली जात असून, येत्या काळातही एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत अशीच कठोर कारवाई सुरूच राहील.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!