तिवसाजवळ अमरावती ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; ५५ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह ट्रक जप्त, दोघांना अटक

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अमरावती ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) एका मोठ्या कारवाईत शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी पानमसाला आणि गुटख्याची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला आहे. या कारवाईत पोलिसांनी ५५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपींना अटक केली आहे.

अटक करण्यात आलेले आरोपी:



१) अब्दुल रफिक अब्दुल शब्बीर (वय ३५ वर्ष, रा. हनुमान मंदिर, महेंद्र कॉलनी, अमरावती)

२) अर्शद खान रहमत खान (वय ३० वर्ष, रा. ताज नगर, पठाण चौक, अमरावती)



घटनेचा सविस्तर तपशील: अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार १२ जुलै २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तिवसा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. यादरम्यान नागपूरकडून तिवसाकडे एका तपकिरी (ब्राऊन) रंगाच्या अशोक लेलँड ट्रकद्वारे (क्र. MH-01-CV-6282) प्रतिबंधित गुटख्याची अवैध वाहतूक केली जाणार असल्याची खात्रीशीर माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाली. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर ते अमरावती रोडवरील तिवसा येथील सुमीत हॉटेलसमोर सापळा रचला. १३ जुलै २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास संशयास्पद ट्रक थांबवून त्यामधील दोन इसमांना ताब्यात घेण्यात आले. ट्रकची तपासणी केली असता, त्यात शासनाने प्रतिबंधित केलेला तंबाखूयुक्त सुगंधी पानमसाला ‘बाजीराव’ आणि सुगंधी तंबाखू ‘मस्तानी’चे एकूण १३० मोठे पांढरे नायलॉनचे बोरे आढळून आले.ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक  निकेतन कदम (भा.पो.से.) आणि अप्पर पोलीस अधीक्षक दत्त तोटेवाड (म.पो.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:



  • प्रतिबंधित गुटखा व पानमसाला: अंदाजे किंमत ३९,००,००० रुपये

  • अशोक लेलँड ट्रक (क्र. MH-01-CV-6282): अंदाजे किंमत १६,००,००० रुपये



  • एकूण जप्त मुद्देमाल: ५५,००,००० रुपये (५५ लाख रुपये)

पुढील कारवाई: अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून तिवसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीण द्वारे केला जात आहे.

कारवाई करणारे पोलीस पथक:

स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर हटवार, पोलीस अंमलदार रवींद्र बावणकर, बळवंत दाभणे, भूषण पेठे, निलेश डांगोरे, पंकज फाटे आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल प्रशीक वानखडे यांचा समावेश होता.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!