
गुन्हे शाखा अमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई: २० किलो गांजा जप्त, ४ आरोपींना अटक
नागपूर शहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करत गांजा बाळगणाऱ्या चार आरोपींना रंगेहात अटक केली आहे.
कारवाईचा तपशील: दिनांक ०१ सप्टेंबर २०२६ च्या रात्री २३:०० ते ०२ सप्टेंबर २०२६ च्या पहाटे ०१:४० वाजेच्या दरम्यान, अमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी व कर्मचारी पाचपावली हद्दीत गस्त (पेट्रोलिंग) घालत होते. त्यादरम्यान ताज नगर, टेका येथील मुस्लिम कब्रस्तानसमोर सार्वजनिक सिमेंट रस्त्यालगत उभ्या असलेल्या एका ह्युंदाई कार आणि रिक्षाजवळ काही इसम संशयितरीत्या आढळून आले.

अटक करण्यात आलेले आरोपी:
१. शेख इम्रान उर्फ बाबा शेख मुख्तार (वय ३८ वर्षे, रा. आशामनी अपार्टमेंट समोर, जाफर नगर, गिट्टीखदान, नागपूर)

२. शेख आबिद उर्फ आबु शेख अन्वर (वय ३४ वर्षे, रा. गुटकाला तलाव परिसर, चंद्रपूर)
३. फैजान रजा अब्दुल जब्बार शेख (वय ३१ वर्षे, रा. सेंट्रल जेल मागे, दादमालवाड, चंद्रपूर)

४. मोहम्मद जुनैद मोहम्मद इब्राहिम राजवाडी (वय ३३ वर्षे, रा. मंगलशहा बाबा दर्गाह जवळ, वनदेवी नगर, यशोधरानगर, नागपूर)
जप्त केलेला मुद्देमाल (एकूण किंमत: ₹१८,१५,७५०/-):

-
गांजा: २० किलो ५८५ ग्रॅम हिरव्या रंगाचा गांजा (किंमत ₹१०,२८,२५०/-)
-
रोख रक्कम: ₹६,५००/-
-
वाहने: १ ह्युंदाई कार (क्र. MH 01 AX 1709) व १ मॅक्सिमा ऑटो (क्र. MH 49 C 7578)
-
मोबाईल: ४ मोबाईल फोन
गुन्ह्याची पार्श्वभूमी व पुढील कारवाई: आरोपींची पंचांसमक्ष अंगझडती व वाहनाची झाडाझडती घेतली असता हा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. अधिक चौकशी केली असता, आरोपींनी त्यांचा फरार साथीदार हॅपी उर्फ पाजी उर्फ हरप्रीत सैनी (रा. जयविजय सोसायटी, दिक्षित नगर, यशोधरानगर) याच्या मदतीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गांजा विक्रीकरिता आणल्याची कबुली दिली.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध पाचपावली पोलीस ठाण्यात NDPS कायद्यातील कलम नुसार गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली आहे. सध्या फरार आरोपीचा शोध आणि पुढील तपास सुरू आहे.
मार्गदर्शन व पथक:
ही कारवाई पोलीस आयुक्त मा. श्री. विश्वास नांगरे पाटील, सह पोलीस आयुक्त मा. श्री. नविनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) मा. श्री. राजेंद्र दाभाडे, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन) मा. श्री. दीपक अग्रवाल आणि सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) मा. श्री. वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. भारत क्षीरसागर, पोउपनि. नागेश पुन्नावाड व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.




