सेवाग्राम पोलिसांची धडक कारवाई: ९ लाख ९४ हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना अटक

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

सेवाग्राम पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे धडक कारवाई करत बेकायदेशीर दारूची वाहतूक करणारी कार पकडली असून, ९ लाख ९४ हजार ९५० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

घटनेचा तपशील व कारवाई:



  • दिनांक: ३ सप्टेंबर २०२६

  • ठिकाण: दत्तपूर येथील उड्डाण पुलाच्या बाजूला, पवनार कडून वर्ध्याकडे जाणारा सर्व्हिस रोड.



  • कारवाई: ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने नाकेबंदी करून मध्य प्रदेशातून विक्रीसाठी आणलेली दारू जप्त केली.

अटक करण्यात आलेले आरोपी:



१. अनिकेत उमेश दुरतकर (वय २२ वर्षे, रा. आर्वी नाका, वर्धा)

२. प्रशील बंडुजीेडाम (वय २२ वर्षे, रा. नालवाडी, वर्धा)



३. अंकुश रामदास भट (वय २२ वर्षे, रा. पवनार, ता. जि. वर्धा)

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल (एकूण किंमत: ₹९,९४,९५०):

  • मारुती सुझुकी सियाझ कार (MH-15-FF-0309) – किंमत ₹८,००,०००/-

  • रॉयल स्टॅग (१८० मि.ली.) – १४४ काचेच्या बाटल्या (३ खोके) – किंमत ₹४३,२००/-

  • ऑफिसर चॉईस (१८० मि.ली.) – ८५ प्लॅस्टिकच्या बाटल्या (१ प्लास्टिक चुंगडी) – किंमत ₹२१,२५०/-

  • ऑफिसर चॉईस ब्लू (१८० मि.ली.) – ९६ काचेच्या बाटल्या (२ खोके) – किंमत ₹२८,८००/-

  • मॅजिक मोमेंट्स (१८० मि.ली.) – ९६ प्लॅस्टिकच्या बाटल्या (२ खोके) – किंमत ₹३८,४००/-

  • रॉयल स्टॅग (७५० मि.ली.) – २४ काचेच्या बाटल्या (२ खोके) – किंमत ₹२८,८००/-

  • किंग फिशनर बीअर (५०० मि.ली.) – १२ कॅन्स (१ प्लास्टिक चुंगडी) – किंमत ₹३,३००/-

  • रॉयल चॅलेंज (१८० मि.ली.) – ४८ बाटल्या (१ खोका) – किंमत ₹१६,८००/-

  • इम्पिरियल ब्लू (१८० मि.ली.) – ४८ बाटल्या (१ खोका) – किंमत ₹१४,४००/-

तपास पथक:

पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल मंडलिक यांच्या आदेशानुसार ठाणेदार देवेंद्र ठाकूर, पो.उप.नि. अजयकुमार येळणे, पो.हवा. संदीप गेंढे स.फौ. सतीश दरवरे  चालक पो.हवा. विलास लोहकरे पो.शि. अक्षय गुडापे आणि पो.शि. किशोर सावरकर यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली. सेवाग्राम पोलीस स्टेशनमध्ये या गुन्ह्याची नोंद करून पुढील तपास सुरू आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!