वर्धा पोलिसांची मोठी कारवाई: अल्पवयीन व विनापरवाना चालकांकडून १ कोटींहून अधिक दंड वसूल

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

वर्ध्यात अल्पवयीन व विनापरवाना वाहन चालकांवर पोलिसांची धडक कारवाई: ऑगस्ट महिन्यात १ कोटींपेक्षा जास्त दंड

वर्धा जिल्ह्यात दुचाकी अपघातांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेने ऑगस्ट महिन्यात विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई केली आहे. या मोहिमेत प्रामुख्याने अल्पवयीन मुलामुलींकडून चालवल्या जाणाऱ्या वाहनांवर आणि त्यांच्या पालकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.



अल्पवयीन वाहन चालक व पालकांवर कारवाई शाळा व कोचिंग क्लासेसला जाण्यासाठी १८ वर्षांपेक्षा कमी वयाची बालके विनापरवाना वाहने चालवत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी ही मोहीम हाती घेतली.

  • अल्पवयीन चालक: विना परवाना वाहन चालवणाऱ्या ९४ अल्पवयीन मुलांवर कारवाई करत रु. ४,७०,००० दंड आकारण्यात आला.



  • पालक व वाहन मालक: अल्पवयीन मुलांना वाहने चालवण्यास दिल्याप्रकरणी २९८ पालकांवर/वाहनांच्या मालकांवर कारवाई करून रु. ४,७०,००० दंड ठोठावण्यात आला.

ऑगस्ट महिन्यातील कारवाईची प्रमुख आकडेवारी ऑगस्ट महिन्यात पोलिसांनी विविध वाहतूक नियमांच्या उल्लंघनाबाबत एकूण ९,१०० ई-चलान केसेस केल्या असून तब्बल रु. १,०९,१४,१५० एवढा दंड आकारला आहे.



  • विना परवाना वाहन चालक: ७३१ केसेस (दंड: रु. ३६,५५,०००)

  • दारू पिऊन वाहन चालवणे: ऑगस्ट महिन्यात ३२ केसेस (जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान एकूण ३७० केसेस)



  • वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे (हातगाड्या/आस्थापना): ३५ केसेस

  • लायसन्स निलंबन: वाहतूक नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या १३४ वाहन चालकांचे लायसन्स निलंबित करण्यात आले

या व्यतिरिक्त विना हेल्मेट, ट्रिपल सीट, वाहन चालवताना मोबाईलचा वापर, सीट बेल्ट न लावणे आणि विना नंबर प्लेट अशा अनेक प्रकारच्या उल्लंघनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनात मोहीम:-

सदर कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल आणि अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार घुले, पोलीस उपनिरीक्षक अमोल लगड, अश्विन गजभिये, जावेद शेख, राजेश कंगाले व वाहतूक पोलीस अंमलदारांनी पार पाडली.

वाहतूक शाखेचे नागरिकांना आवाहन:-

रस्त्यावरील अपघात आणि जीवितहानी रोखण्यासाठी वर्धा जिल्हा वाहतूक शाखेने सर्व नागरिकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. पालकांनी आपल्या १८ वर्षांखालील पाल्यांच्या हातात कोणत्याही परिस्थितीत वाहने देऊ नयेत, अन्यथा पुढील काळातही अशीच कठोर कायदेशीर कारवाई चालू राहील, असा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार घुले यांनी दिला आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!