बल्लारपूर-बामणी मार्गावर ५.७४९ किलो गांजा जप्त; दोघांना अटक

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

चंद्रपूर जिल्ह्यात अवैध अमली पदार्थांच्या वाहतूक व विक्रीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक मोहीम उघडली आहे. याच मोहिमेअंतर्गत ५ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ५.७४९ किलो गांजा जप्त करत दोन आरोपींना रंगेहात अटक केली.

गुप्त बातमीच्या आधारे रचला सापळा ४ सप्टेंबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चंद्रपूर शहरात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने गस्त घालत असताना, दोन व्यक्ती बल्लारपूरहून बामणीमार्गे चामोर्शीच्या दिशेने गांजाची वाहतूक करणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवण्यात आले. त्यानंतर राजपत्रित अधिकारी व पंचांसमक्ष बल्लारपूर-बामणी मार्गावरील होंडा शोरूम आणि जिओ सेंटर परिसरात रात्रीच नाकेबंदी व सापळा रचण्यात आला.



पहाटे २:३५ वाजता मुसक्या आवळल्या ५ सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे २:३५ वाजताच्या सुमारास संशयित वर्णनाशी मिळत्याजुळत्या दोन व्यक्ती हातात लाल-काळ्या रंगाच्या बॅगा घेऊन बामणीच्या दिशेने जाताना दिसल्या. पोलिसांनी तातडीने त्यांना घेरून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी आपली नावे पुढीलप्रमाणे सांगितली:

  • मंगेश संतोष उंदीरवाडे (वय २३ वर्षे, रा. सोनापूर, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली)



  • सागर बाबूराव मरगडे (वय १९ वर्षे, रा. निमगाव, ता. पवनी, जि. भंडारा)

३.३२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत पंचांसमक्ष आरोपींच्या बॅगांची झडती घेतली असता, ब्राऊन पॅकिंग टेपने गुंडाळलेली पार्सल्स व सुटा गांजा मिळून आला. पोलिसांनी कारवाईत खालील साहित्य जप्त केले आहे:



  • ५.७४९ किलो गांजा

  • २ मोबाईल फोन



  • ३,८०० रुपये रोख रक्कम

  • वाहतुकीसाठी वापरलेली बॅग व साहित्य

एकूण ३ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून प्राथमिक चौकशीत हा गांजा ओडिशा राज्यातून तस्करी करून आणल्याचे निष्पन्न झाले आहे.

NDPS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल या प्रकरणी आरोपींवर बल्लारपूर पोलीस ठाण्यात ‘गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५’ (NDPS Act) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

तपास पथक

सदर यशस्वी कारवाई चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक  आयुष नोपानी व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि योगेश हिवसे, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनील गोरकर, पोहवा सतीश आवठारे, इम्रान खान, लाले यादव, संदीप, प्रफुल गारघाटे, किशोर वैरागडे, हिरालाल गुप्ता, पोअं. किशोर वाकडे, शशांक बदामवार, चा.पो.अ. मिलिंद टेकाम व सायबर ठाण्याचे कार्तिक खणके यांच्या पथकाने केली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!