
अकोल्यात LCB ची ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत मोठी कारवाई; जुगार अड्ड्यावर धाड टाकून १८ जणांना अटक, १० लाखांचा मुद्देमाल जप्त!
अकोला जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) “ऑपरेशन प्रहार” अंतर्गत धाडशी कारवाई केली आहे.
कारवाईचा सविस्तर तपशील:

-
ठिकाण व वेळ: ५ सप्टेंबर २०२६ रोजी अकोला शहरातील जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मो. रेहमान मो. इब्राहिम याच्या घरावरील हॉलमध्ये हा जुगार अड्डा सुरू असल्याची गुप्त माहिती एलसीबीला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या ठिकाणी तात्काळ छापा टाकला.
-
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:

-
नगदी रक्कम: ₹१,६०,५५०/-
-
मोबाईल: १४ वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल (किंमत सुमारे ₹१,९७,०००/-)

-
वाहने: ६ मोटारसायकली (किंमत सुमारे ₹६,७०,०००/-)
-
एकूण मुद्देमाल: ₹१०,२७,७५०/- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

-
अटक करण्यात आलेले १८ आरोपी:
छाप्यादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून वजीर खान अब्दुल्ला खान, मोहसीन खान मोहम्मद खान, जाफर हुसैन तैजीब अली, जावेद खान शेर खान, अब्दुल रिजवान अब्दुल गणी, असलम अली शौकत अली, शेख वसीम शेख रशीद, शेख जुबेर शेख हबीब, सैयद इमरान सैयद इकबाल, मोहम्मद शाहीद मोहम्मद जावीद, मोहम्मद साहील शेख सलीम, मोहम्मद हनीफ मो. अनिस, शेख मुस्ताक शेख मुसा, अब्दुल अबरार अब्दुल नबी, शेख साजीद शेख निसार, शेख कयुम शेख करीम, जुनैद शाह सलीम शाह, आणि शाकीर खान उर्फ पपैया अहमद खान या १८ जणांना ताब्यात घेतले.
पोलीस पथक व मार्गदर्शन:
ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक व अपर पोलीस अधीक्षक बि. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, स.पो.नि. निलेश देशमुख, स.पो.नि. गोपाल जाधव, पो.उप.नि. माजीद पठाण, पो.उप.नि. अनिल चव्हाण आणि अंमलदार शेख हसन, सुलतान पठाण, भास्कर धोत्रे, अब्दुल माजीद, खुशाल नेमाडे, एजाज अहमद, अमीत दुबे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पार पाडली.
सर्व आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी जुने शहर पोलीस स्टेशन, अकोला यांच्या ताब्यात देण्यात आले आहे




