सिताबर्डी पोलिसांची धडक कारवाई: १२ दुचाकींसह ५.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त; २ चोरांना ठोकल्या बेड्या

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

नागपूरच्या सिताबर्डी पोलीस ठाण्याच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळत ५ लाख ५५ हजार रुपये किमतीच्या १२ इलेक्ट्रिक आणि इतर दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत.

घटनेची पार्श्वभूमी व कारवाईचा तपशील:



  • तक्रार: सिताबर्डी येथील रहिवासी मोहम्मद जाकीर नवाज (वय ४०) यांची ६०,००० रुपये किमतीची काळ्या रंगाची इलेक्ट्रिक बाईक २८ ऑगस्ट २०२६ रोजी राहत्या घरासमोरून चोरीला गेली होती. याप्रकरणी सिताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

  • आरोपीची अटक: पोलिसांनी तांत्रिक तपास करून तपीश राहुल बागडे (वय २४, रा. हरीजन कॉलनी, जरीपटका, नागपूर) याला ३ सप्टेंबर २०२६ रोजी ताब्यात घेतले.



  • पसार साथीदार: तपीश बागडे याने त्याचा साथीदार ऋषभ चंद्रशेखर कावळे (वय २५, रा. हरीजन कॉलनी, जरीपटका, नागपूर) याच्या मदतीने या गाड्या चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलीस सध्या फरार ऋषभचा शोध घेत आहेत.

जप्त केलेला मुद्देमाल व उघडकीस आलेले गुन्हे: पोलिसांनी आरोपींकडून एक ६०,००० रुपयांची होंडा डिओ आणि विविध कंपन्यांच्या ११ इलेक्ट्रिक बाईक्स असा एकूण १२ गाड्यांचा ५,५५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे सिताबर्डी, गणेशपेठ आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यांमधील ५ गुन्हे उघडकीस आले असून इतर गाड्यांचा तपास सुरू आहे.



क्र. पोलीस ठाणे / परिसर उघडकीस आलेला गुन्हा / जप्त वाहन अंदाजे किंमत
सिताबर्डी

इलेक्ट्रो व्हिल्स निळी ई-बाईक & काळी ई-बाईक

₹ १,१०,०००/-



गणेशपेठ

पॉवर टोनिक्स लाल ई-बाईक & ९१ काळी ई-बाईक

₹ १,४०,०००/-

एमआयडीसी

जे कॉन पांढरी ई-बाईक

₹ ६०,०००/-

इतर परिसर (फुटाळा, दहीबाजार, इ.)

होंडा डिओ व विविध कंपन्यांच्या ७ ई-बाईक्स

₹ २,४५,०००/-

तपास पथक:

पोलीस आयुक्त डॉ. विश्वास नांगरे पाटील, सह पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त विनीता साहू, पोलीस उपआयुक्त अन्नपूर्णा सिंह, आणि सहायक पोलीस आयुक्त सुनीलसिंह पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास राऊत, पोलीस निरीक्षक मनिष कोल्हटकर, पोउपनि शाम वारंगे, पोउपनि राहुल वंजारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!