चंद्रपूरमध्ये समतानगर येथे जुगारावर पोलिसांची मोठी धाड; ११ जणांसह १२ लाखांचा मुदमाल जप्त

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow


चंद्रपूर, २० ऑक्टोबर २०२६:

रामपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तुकूम भागातील समतानगर येथे सुरू असलेल्या अवैध जुगारावर रामनगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एका राहत्या घरावर धाड टाकून पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या आणि खेळवणाऱ्या एकूण ११ जणांना रंगेहात अटक केली आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी एकूण १२,०६,४४०/- रुपये किमतीची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.





कारवाईची पार्श्वभूमी: पोलीस स्टेशन रामनगरच्या शोध पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की, समतानगर, तुकूम येथील राजेंद्र सोमाजी रायपुरे याच्या राहत्या घराच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत अवैध जुगार सुरू आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दिनांक २०/१०/२०२६ रोजी दुपारी १६.५० वाजता संबंधित ठिकाणी छापा टाकला.



पोलिसांच्या जाळ्यात अडकलेले ११ आरोपी: घटनास्थळावरून पोलिसांनी खालील ११ जणांना ताब्यात घेतले:



  • शैलेश गंगाधर पोडल्लीवार (वय ५०, शिक्षक, जिल्हा परिषद, रा. छत्रपती नगर, चंद्रपूर)

  • रंजु कालिदास दूर्योधन (वय ५४, ऑटो चालक, रा. वैद्यनगर, चंद्रपूर)



  • इंद्रजीत सोमाजी रायपुरे (वय ५८, मजुरी, रा. तुकडोजी नगर, चंद्रपूर)

  • राजेंद्र सोमाजी रायपुरे (वय ५३, मजुरी, रा. एसटी वर्कशॉप, चंद्रपूर)



  • राजेश्वर पोचम दुर्गे (वय ४८, डब्ल्यूपीसीएल नोकरी, रा. भिवापूर वार्ड, चंद्रपूर)

  • लतीत उर्फ क्षितीज बाकाराम देशपांडे (वय ४८, खाजगी नोकरी, रा. छत्रपती नगर, चंद्रपूर)

  • अनिल यशवंत बनकर (वय ६५, रिटायर्ड डब्ल्यूपीसीएल, रा. सिनाळा, चंद्रपूर)

  • किशोर वसंता पारखी (वय ४९, डब्ल्यूपीसीएल नोकरी, रा. इंदिरानगर, चंद्रपूर)

  • सुनील रामचंद नगराळे (वय ६३, रिटायर्ड डब्ल्यूपीसीएल, रा. एसबीआय कॉलनी, चंद्रपूर)

  • संजू खुशाल दूर्योधन (वय ३८, डब्ल्यूपीसीएल नोकरी, रा. शक्तीनगर, दुर्गापूर, चंद्रपूर)

  • विजय गजानन रायपुरे (वय ५५, डब्ल्यूपीसीएल नोकरी, रा. समता कॉलनी, चंद्रपूर)

कायदेशीर कारवाई आणि गुन्हा:

आरोपींच्या ताब्यातून जुगाराचे साहित्य आणि रोख रकमेसह एकूण १२,०६,४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सर्व ११ आरोपींविरुद्ध रामनगर पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम ०४ व ०५ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील कायदेशीर तपास सुरू आहे.

मार्गदर्शन व तपास पथक:

सदर धडक कारवाई पोलीस अधीक्षक  आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर काककडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस स्टेशनच्या निरीक्षक प्रभावती एकुरके, स.पो.नि. शिवाजी नागवे, हनुमान उगले, पो.उप.नि. कृष्णा दराडे आणि इतर पोलीस अंमलदारांच्या पथकाने पार पाडली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!