
पुलगाव येथे वर्धा जिल्हा पोलिसांची मासिक गुन्हे आढावा बैठक पारडली
वर्धा जिल्हा पोलीस दलाची माहे ऑगस्ट-२०२६ ची मासिक गुन्हे आढावा बैठक मंगळवार, दिनांक ०८ सप्टेंबर २०२६ रोजी पुलगाव (जि. वर्धा) येथे पार पडली. पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल आणि अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपूर्ण जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
विविध विषयांवर पीपीटी (PPT) द्वारे सादरीकरण:

-
PIT NDPS प्रस्ताव: उपविभागीय पोलीस अधिकारी (हिंगणघाट) सुशील कुमार नाईक यांनी या कारवाई प्रस्तावावर सविस्तर माहिती दिली.
-
ध्वनी प्रदूषण SOP: उपविभागीय पोलीस अधिकारी (वर्धा) सुनील महाडीक यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा, BNS अंतर्गत उपद्रव रोखणे, पर्यावरण संरक्षण कायदा, मोटार वाहन कायदा आणि मकोका अंतर्गत कारवायांबाबत सादरीकरण केले.

-
स्वयंमूल्यांकन: उपविभागीय पोलीस अधिकारी (पुलगाव) वंदना कारखेले यांनी ‘Self Assessment’ विषयावर सादरीकरण केले.
-
NATGRID प्रणाली: सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकचंद्रकांत पाटील यांनी या प्रणालीच्या वापराबद्दल माहिती दिली.

-
दहशतवाद व डिजिटल आव्हाने: प्रभारी अधिकारी (ATS नागपूर युनिट) यांनी दहशतवाद विरोधी यंत्रणेबाबत सादरीकरण केले.
-
आगामी सण-उत्सव सुरक्षा: आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सहायक पोलीस निरीक्षक मिलिंद दवणे (विशेष शाखा) यांनी सुरक्षा नियोजनाची माहिती दिली.

-
N.C.L. Review: अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांनी N.C.L. बाबींचा आढावा घेतला.
पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांचे मुख्य निर्देश:
-
अमली पदार्थ विरोधी कारवाई: अमली पदार्थांच्या गुन्ह्यांत लिप्त असणाऱ्यांवर मकोका (MCOCA), एमपीडीए (MPDA) व PIT NDPS सारख्या कडक कायद्यांतर्गत कारवाई करणे आणि अमली पदार्थमुक्त समाजासाठी जनजागृती मोहीम राबवणे.
-
वाहतूक शिस्त व गस्त: वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करण्यासाठी नियमित पेट्रोलिंग ठेवणे, ज्यामुळे सर्वसामान्यांना त्रास होणार नाही.
-
सण-उत्सव व सोशल मीडिया: आगामी सणांसाठी योग्य बंदोबस्त ठेवणे व सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकुरावर बारकाईने लक्ष ठेवणे.
-
गुन्हे तपास व शोध: दाखल गुन्ह्यांचा, घरफोडी व चोरीच्या प्रकरणांचा जलद निपटारा करणे, मुद्देमाल शोधणे आणि हरवलेल्या व्यक्ती/बालकांचा SOP नुसार तातडीने शोध घेणे.
-
अवैध धंद्यांवर कारवाई: अवैध दारू विक्री, तस्करी आणि अवैध जुगाराच्या ठिकाणांवर शोध मोहीम राबवून कडक कारवाई करणे.
-
न्यायालयीन दोषसिद्धी व संवाद: शास्त्रोक्त तपास करून न्यायालयात भक्कम पुरावे सादर करून दोषसिद्धीचे प्रमाण वाढवणे; तसेच पोलीस ठाणेदारांनी हद्दीत नियमित ‘संवाद’ बैठका आयोजित करणे.
या बैठकीस वर्धा जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणेदार आणि विविध शाखांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर सर्व अधिकारी व अंमलदारांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.




