अंबाझरी पोलिसांची मोठी कामगिरी: चोरीचा गुन्हा उघडकीस, ०२ आरोपींना अटक

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

नागपूर: निर्माणाधीन इमारतीतील कॉपर वायर चोरणारे दोन सराईत गजाआड; अंबाझरी पोलिसांची कारवाई, मुद्देमाल जप्त

नागपूर: गांधीनगर परिसरातील एका निर्माणाधीन इमारतीतून कॉपर वायर व एसी फिटिंगचे पाईप चोरणाऱ्या दोन सराईत चोरांना अंबाझरी पोलिसांनी तातडीने शोध घेऊन बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि जळलेली कॉपर तार असा १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नेमकी काय आहे घटना?

गांधीनगर येथील प्लॉट क्र. ३२१ चे रहिवासी फिर्यादी पराग प्रकाशराव बेलोस्कर (वय ५३ वर्षे) यांच्या मालकीच्या इमारतीचे बांधकाम गांधीनगर भागात सुरू आहे. दिनांक ०७ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या रात्री ११:०० वाजेपासून ते ०८ ऑक्टोबर २०२६ च्या सकाळी १०:०० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने इमारतीच्या आत प्रवेश केला. चोरट्याने इमारतीच्या सिलिंग व भिंतीला लावलेले २० किलो कॉपर वायर आणि एसी फिटिंगचा कॉपर पाईप कापून असा एकूण ४५,००० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.



या घटनेनंतर फिर्यादी पराग बेलोस्कर यांनी अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली.

खात्रीशीर माहिती आणि आरोपींना बेड्या

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून अंबाझरी पोलिसांच्या तपास पथकाने घटनास्थळाची पाहणी केली आणि गोपनीय माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी वैभव उर्फ वांद्या संजय वानरे (वय २० वर्षे, रा. संजय नगर, पांढराबोडी, नागपूर) याला ताब्यात घेतले.



पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता, त्याने आपल्या साथीदारासह ही चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या कबुलीवरून पोलिसांनी त्याचा साथीदार प्रवीण उर्फ नाईंटी तेजलाल भलावी (वय २४ वर्षे, रा. संजय नगर, पांढराबोडी, नागपूर) यालाही ताब्यात घेतले.

मुद्देमाल जप्त

दोन्ही आरोपींची सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून चोरी केलेली जाळलेली कॉपर तार आणि चोरी करण्यासाठी वापरलेली स्प्लेंडर मोटरसायकल (क्रमांक: MH 31 GE 7322) असा एकूण १५,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.



वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व तपास पथक

ही यशस्वी कारवाई  ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सह पोलीस आयुक्त  नविनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त (उत्तर प्रभाग)विनीता शाहू, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ २)अन्नपूर्णा सिंह, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (सिताबर्डी विभाग)  सुनिलसिंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

तपास पथकात अंबाझरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  विनोद गोडबोले, पोलीस उपनिरीक्षक निलेश पदकोंडे, पोलीस हवालदार कमलेश ननीर, तसेच पोलीस अंमलदार अमित तिवारी, मनिष रामटेके आणि शत्रुघ्न यांचा समावेश होता.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!