
गणराज ट्रॅव्हल्समध्ये LCB ची धाड: दारू तस्कर ३ महिला ताब्यात, ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त

चंद्रपुरात ‘गणराज ट्रॅव्हल्स’मधून अवैध विदेशी दारूची तस्करी; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, ३ महिलांसह ६१ हजार रुपयांचा माल जप्त
चंद्रपूर: नागपूरहून ट्रॅव्हल्स बसद्वारे चंद्रपूर शहरात अवैधरीत्या सुरू असलेली विदेशी दारूची तस्करी स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने उघडकीस आणली आहे. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी वरोरा नाका चौक येथे रचलेल्या सापळ्यात ३ महिला आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून ₹ ६१,८२०/- किंमतीचा विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे.
कारवाईचा घटनाक्रम
नागपूरकडून येणाऱ्या गणराज ट्रॅव्हल्स (क्रमांक MH 49 AT 1696) मधून मोठ्या प्रमाणात विदेशी दारूची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त बातमी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिसांनी वरोरा नाका चौक, चंद्रपूर येथे तात्काळ नाकाबंदी करून सापळा रचला.


बस चौक परिसरात पोहोचताच पोलिसांनी ट्रॅव्हल्स थांबवून पंचासमक्ष संशयित महिलांच्या साहित्याची झडती घेतली. झडती दरम्यान त्यांच्याजवळील बॅगमध्ये अवैध विदेशी दारूच्या बाटल्यांचा साठा आढळून आला.

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:
-
बॉम्बे व्हिस्की (Bombay Whiskey): ७५० मि.ली. च्या ८० सीलबंद बाटल्या

-
ऑफिसर चॉईस व्हिस्की (Officer’s Choice Whiskey): १८० मि.ली. च्या १०० सीलबंद बाटल्या
-
एकूण जप्त माल किंमत: ₹ ६१,८२०/-

ताब्यात घेतलेल्या महिला आरोपींची नावे:
फरार / पाहिजे असलेला आरोपी:
-
प्रिन्स केंजर, रा. केंजर मोहल्ला, चंद्रपूर
तपासातील धक्कादायक माहिती: पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत या आरोपी महिला नागपूरहून विदेशी दारूचा साठा आणून चंद्रपूर येथील मुख्य सूत्रधार प्रिन्स केंजर याला विक्रीसाठी हस्तांतरित करणार होत्या. सध्या पोलिसांचे पथक फरार आरोपी प्रिन्स केंजर याच्या शोधात आहे.

रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
कारवाई करणारे पथक:
स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या या यशस्वी कारवाईत खालील अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला:
-
अधिकारी: API हिवसे, PSI भुरले, PSI बेलसरे
-
अंमलदार/कर्मचारी: पोलीस हवालदार (HC) नितीन, जयसिंग, सतीश, इम्रान, लालू, हिरा, संदीप तसेच पोलीस अंमलदार (PC) किशोर व शशांक.



