
अमरावती ग्रामीण: चांदूर रेल्वेमध्ये जुगारावर धाड; ८ जणांना अटक, २ लाखांचा मुद्देमाल जप्त

अमरावती ग्रामीण: स्थानिक गुन्हे शाखेची चांदूर रेल्वेमध्ये जुगारावर मोठी कारवाई; ८ जण जागीच जेराब, २ लाख ३ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
अमरावती ग्रामीण:
जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर अंकुश ठेवण्यासाठी आणि कडक कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण यांच्या निर्देशानुसार “ऑपरेशन कवच” ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत अमरावती ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने चांदूर रेल्वे शहरात मोठी धडक कारवाई करत जुगार खेळणाऱ्या ८ जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून २ लाख ३ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


गोपनीय माहितीवरून छापा
दिनांक २६ ऑक्टोबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चांदूर रेल्वे उपविभागात अवैध धंद्यांच्या प्रतिबंधासाठी पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना गोपनीय बातमी मिळाली. चांदूर रेल्वे शहरातील मारवाडी लाईन परिसरातील बजरंगबली मंदिराच्या जवळील एका टीनाच्या शेडमध्ये काही जण पत्त्यांवर पैशांची बाजी लावून ‘एक्का बादशा’ नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ संबंधित ठिकाणी छापा टाकला.

छापा टाकला असता काही इसम गोलाकार बसून ५२ तासांच्या पत्त्यांवर जुगार खेळत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी घटनास्थळावरून खालील आठही आरोपींना ताब्यात घेतले:

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे:
१. चंदन उर्फ भल्ला सुरेश मारोटे (वय ४१ वर्ष, रा. मारवाडी लाईन, चांदूर रेल्वे)
२. अरूण शहा सज्जार शहा (वय ४२ वर्ष, रा. चांदूरवाडी, चांदूर रेल्वे)

३. अमोल श्रीराम राउत (वय २७ वर्ष, रा. खडकपूरा, चांदूर रेल्वे)
४. प्रवीण सुरेश ठाकरे (वय ४६ वर्ष, रा. गांधी चौक, चांदूर रेल्वे)

५. महेश मोरेश्वर इंगळे (वय ४६ वर्ष, रा. गोदावरी नगर, चांदूर रेल्वे)
६. अब्दुल फरहान अ. फिरोज (वय २१ वर्ष, रा. डांगरीपूरा, चांदूर रेल्वे)
७. मो. आसीफ नूर मोहम्मद (वय ३० वर्ष, रा. काजीपूरा, चांदूर रेल्वे)
८. मो. रफीक मो. आसीफ (वय ४३ वर्ष, रा. शिवाजीनगर, चांदूर रेल्वे)
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल (किंमत अंदाजे २,०३,९००/- रुपये):
पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य आणि वाहने असा एकूण २,०३,९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे:
-
नगदी रोख व इतर साहित्य: ३३,९००/- रुपये
-
हिरव्या रंगाची येमाहा दुचाकी (वाहन क्र. MH 27 BY 6047): ७०,०००/- रुपये
-
काळया रंगाची पॅशन प्रो दुचाकी (वाहन क्र. MH 27 CM 5903): ६०,०००/- रुपये
-
काळया रंगाची टीव्हीएस फोनिक्स (TVS Phoenix) दुचाकी: ४०,०००/- रुपये
-
५२ ताश पत्ते
पोलीस पथकाची कारवाई
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम (भा.पो.से.) यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वात पार पडली. या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक रोहीत कुदळे तसेच पोलीस अंमलदार सचिन गायधने, गजेन्द्र ठाकरे, सुधीर बावणे आणि चेतन दुबे यांनी सहभाग घेतला होता.



