चोरीचे ४ गुन्हे उघड, ३ आरोपी अटक; स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण यांची मोठी कामगिरी नागपूर:

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

नागपूर: नागपूर ग्रामीण जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक मा. श्री. हर्ष ए. पोद्दार आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने सायबर पोलीस स्टेशनच्या सहकार्याने एक मोठी कारवाई केली आहे. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत पोलिसांनी बकरी चोरीचे ३ गुन्हे आणि मोटरसायकल चोरीचा १ गुन्हे असे एकूण ४ गुन्हे उघडकीस आणले आहेत.

कारवाईचा सविस्तर तपशील: पोलीस स्टेशन पाचगाव येथील अप. क्र. ४१/२६ कलम ३०३ (२) भा.न्या.सं. च्या तपासकामादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, या गुन्ह्यात एका पांढऱ्या रंगाच्या होंडा सिटी कारचा (क्र. MH-43/V-5025) वापर करण्यात आला होता. या वाहनाचा शोध घेत असताना ३ जुलै २०२६ रोजी उमरेड रोडवरील बहादूरा फाटा येथून ही कार पोलिसांच्या ताब्यात आली.



या कारमध्ये खालील दोन मुख्य आरोपी मिळून आले: १) शाहिद फिरोज खान (वय २४ वर्षे, रा. ताजबाग, नागपूर)

२) अब्दुल फैज अब्दुल रफिक (वय २३ वर्षे, रा. ताजबाग, नागपूर)



दोघांना ताब्यात घेऊन कौशल्यपूर्ण विचारपूस केली असता, त्यांनी त्यांच्या आणखी एका साथीदारासह पाचगाव, कुही आणि मोहपा येथून बकऱ्यांची चोरी केल्याची कबुली दिली. तसेच नागपूर येथून एक मोटरसायकल देखील चोरी केल्याचे सांगितले.

तपासादरम्यान ३ जुलै २०२६ रोजीच चोरीच्या बकऱ्या विकत घेणाऱ्या तिसऱ्या आरोपीलाही पोलिसांनी नागपूर येथून ताब्यात घेतले: ३) अब्दुल मदनी अब्दुल गणी (वय ३२ वर्षे, रा. ताजबाग, नागपूर) या तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.



६,८४,०५० रुपयांचा मुद्देमाल जप्त: पोलीस प्रशासनाने पंचांसमक्ष आरोपींकडून एकूण ६,८४,०५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये खालील वस्तूंचा समावेश आहे:

  • गुन्ह्यात वापरलेली होंडा सिटी कार (MH-43/V-5025) – किंमत रु. ५,००,०००/-



  • चोरी केलेली एक विना क्रमांकाची हिरो पॅशन एक्स प्रो मोटरसायकल – किंमत रु. ४०,०००/-

  • ८ बकऱ्या – किंमत रु. ५०,०००/-

  • २ अँड्रॉइड मोबाईल – किंमत रु. २०,०००/-

  • चोरीच्या बकऱ्यांची विक्री करून मिळालेले रोख पैसे – रु. ७४,०००/-

  • इतर साहित्य

स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण पोलिसांच्या या यशस्वी कारवाईमुळे परिसरात चोरी करणाऱ्या टोळीला चाप बसला आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!