
अमरावती: जिल्हा प्रशिक्षण केंद्रासमोरून दुचाकी चोरणारा जेरबंद, गुन्हे शाखेकडून वाहन जप्त
अमरावती शहरातील जिल्हा प्रशिक्षण केंद्रासमोरून दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत चोराला गुन्हे शाखेने अटक केली असून, त्याच्याकडून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
अमरावती येथील नवसारी, श्रद्धा कॉलनीतील रहिवासी उमेश बाबूलाल जाधव यांनी ४ फेब्रुवारी २०२६ रोजी गाडगेनगर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीची तक्रार नोंदवली होती. जाधव हे जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या जिल्हा प्रशिक्षण केंद्रासमोर आपली हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटारसायकल लॉक करून कामासाठी गेले होते. काम संपवून परत आले असता, त्यांना त्यांची दुचाकी त्या ठिकाणी मिळून आली नाही. परिसरात शोध घेऊनही गाडी न सापडल्याने त्यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गाडी चोरी केल्याची तक्रार दाखल केली होती.सदरची यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपआयुक्त यशवंत सोळंके (परिमंडळ ०१), पोलीस उपआयुक्त प्रांजली सोनावणे (मुख्यालय), सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) कैलास फुंडकर, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश ब्राम्हणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या गुन्ह्याचा समांतर तपास अमरावती शहराची गुन्हे शाखा करत होती. तपासादरम्यान गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, हैदरपुरा भागातील एक व्यक्ती हिरो होंडा स्प्लेंडर प्लस गाडी विकण्याचा प्रयत्न करत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संशयित आरोपीला ताब्यात घेतले आणि दुचाकीबाबत चौकशी केली. चौकशीदरम्यान त्याने गाडगेनगर हद्दीतून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.
आरोपीचे नाव आणि जप्त मुद्देमाल:

-
आरोपी: वसीम खान बब्बू खान (वय ३९ वर्षे, रा. हैदरपुरा, अमरावती).
-
जप्त मुद्देमाल: अंदाजे १५,००० रुपये किमतीची निळ्या रंगाचा पट्टा असलेली काळ्या रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटारसायकल (चेचिस क्र. MBLHA10AABHC03198, इंजिन नंबर HA10EGBHC07142).

गुन्हे शाखेने आरोपी आणि जप्त केलेली दुचाकी पुढील कायदेशीर कारवाईसाठी गाडगेनगर पोलिसांच्या ताब्यात दिली आहे.
पोलिस पथक: या कारवाईत पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे, सपोनि मनीष वाकोडे, सपोनि दशरथ आडे, सहा. पोउपनि फिरोज खान आणि गुन्हे शाखेच्या इतर अंमलदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली.





