
अमरावती शहर गुन्हे शाखेची धडक कारवाई; गोडाऊन चोरीतील बालक आणि जबरी चोरीचा आरोपी जेरबंद

अमरावती शहर गुन्हे शाखेची मोठी कारवाई: गोडाऊन चोरीतील विधी संघर्षग्रस्त बालक आणि जबरी चोरीचा आरोपी मुददेमालासह जेरबंद
अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पथकाने दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये धडक कारवाई करत जबरी चोरीचा एक आरोपी आणि मोरबाग येथील गोडाऊन चोरीतील एक विधी संघर्षग्रस्त बालक यांना मुददेमालासह ताब्यात घेतले आहे. ही कारवाई १० नोव्हेंबर २०२६ रोजी अमरावती शहर गुन्हे शाखेने केली.
१. बडनेरा परिसरातील जबरी चोरीचा आरोपी जेरबंद
-
गुन्ह्याची पार्श्वभूमी: पोलीस स्टेशन बडनेरा हद्दीत दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यांच्या समांतर तपासादरम्यान गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, आरोपी प्रतिक विनोद कैथवास हा जबरी चोरीतील मोबाईल विक्रीसाठी फेजरपुरा हद्दीतील ऑक्सिजन पार्क जवळ येणार आहे.

-
कारवाई: गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ सापळा रचून आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले. विचारपूस केली असता त्याने बडनेरा हद्दीतील गोविंद महाराज मंदिरा जवळ एका व्यक्तीकडून साथीदारांच्या मदतीने मोबाईल जबरीने हिसकावून घेतल्याची कबुली दिली.

-
जप्त मुददेमाल: आरोपीकडून ३०,०००/- रुपये किमतीचा पांढऱ्या रंगाचा ॲपल कंपनीचा आयफोन जप्त करण्यात आला असून पुढील तपासासाठी त्यास पो.स्टे. बडनेरा यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

-
आरोपीचे नाव: प्रतिक विनोद कैथवास, वय २० वर्ष, रा. माता फैल, बडनेरा.
२. मोरबाग येथील गोडाऊन चोरी प्रकरणातील विधी संघर्षग्रस्त बालक ताब्यात
-
गुन्ह्याची पार्श्वभूमी: पो.स्टे. सिटी कोतवाली हद्दीतील मोरबाग येथील झुम्मनशाह बाबा दर्ग्या जवळील दोन गोडाऊनमध्ये रात्रीच्या सुमारास अज्ञात चोराने चोरी केली होती.

-
कारवाई: नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाला भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताची ओळख पटवली. त्यानंतर खत्री मार्केट परिसरातील बंद दुकानाचा आडोसा घेऊन लपलेल्या विधी संघर्षग्रस्त बालकाला सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. त्याने चोरी केल्याची कबुली दिली असून त्याला पुढील कारवाईसाठी पो.स्टे. सिटी कोतवाली यांच्याकडे वर्ग करण्यात आले आहे.
-
जप्त मुददेमाल:

-
रोख नगदी: ११,०७०/- रुपये
-
एक सिल्वर रंगाचा सिक्का (किंमत ७५०/- रुपये)
-
एक लालसर रंगाचा सिक्का (किंमत १००/- रुपये)
-
एकुण किमतीचा मुददेमाल: १८,९२०/- रुपये
-
मार्गदर्शक व तपास पथक
सदरची ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त (परिमंडळ ०१) यशवंत सोळंके, पोलीस उपायुक्त (परिमंडळ ०२) श्याम घुगे, पोलीस उपायुक्त मुख्यालय तथा गुन्हे प्रांजली सोनवणे आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) निलेश ब्राम्हणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पो.नि. अतुल वर व पो.नि. दिनेश दहातोंडे यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांनी पार पाडली आहे.



