
नांदगाव पेठ घरफोडी प्रकरणाचा पर्दाफाश; सराईत व तडीपार आरोपी अमरावती गुन्हे शाखेच्या जाळ्यात!

नांदगाव पेठ घरफोडी प्रकरणाचा पर्दाफाश; सराईत घरफोडी करणारा व तडीपार आरोपी अमरावती गुन्हे शाखेच्या जाळ्यात!
अमरावती: पोलीस स्टेशन नांदगाव पेठ हद्दीतील सातबंगला परिसर येथे घरफोडी करणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत आरोपी आणि अमरावती शहरातून तडीपार असलेला आरोपी यांना अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पथकाने चोरीच्या मुद्द्यामालासह जेरबंद केले आहे.
पोलीस स्टेशन नांदगाव पेठ येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता.या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखेच्या पथकाने सातबंगला परिसरातील विविध ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण केले. तसेच गोपनिय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा गुन्हा रेकॉर्डवरील सराईत घरफोडी करणारा आरोपी शेख जावेद उर्फ बबले आणि आयुक्तालय हद्दीतून तडीपार असलेला आरोपी सैयद तौसीफ यांनी केल्याचे निष्पन्न झाले. हे आरोपी चोरी केल्यानंतर पोलिसांना चकमा देण्यासाठी जिल्ह्याबाहेर राहत असत.

सापळा रचून कारवाई:
गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनिय बातमीदारामार्फत आरोपींच्या हालचालींवर आणि शहरात येण्यावर सतत नजर ठेवली. यादरम्यान, आज दिनांक १२/११/२०२६ रोजी अमरावती बस डेपो येथे आरोपी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने सायन्स कोर मैदान येथील गेटजवळ सापळा रचला. काही वेळानंतर दोन संशयित इसम तिथे आल्यावर पथकाने त्यांना तात्काळ ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे सोन्याचे दागिने दिसून आले. विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी ही चोरी नांदगाव पेठ हद्दीतील सात बंगला परिसरात केल्याची कबुली दिली. काही सोन्याचे दागिने अमरावती येथील सराफा बाजारात विकल्याचे त्यांनी सांगितले असून, पुढील तपासासाठी दोन्ही आरोपींना व मुद्देमाल पोलीस स्टेशन नांदगाव पेठ यांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

ताब्यात घेण्यात आलेले आरोपी:
१. शेख जावेद उर्फ बबलु शेख भुरू (वय ५० वर्ष, रा. शारदा लेआउट हनुमान नगर, खरबी, नागपूर, ह.मु. जोगेश्वरी, वाळूज एम.आय.डी.सी., संभाजीनगर)

२. सैयद तौसीफ सैयद आसीफ (वय २५ वर्ष, रा. रहेमत नगर)
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:
-
सोन्याचे दागिने (किंमत अंदाजे २,९०,०००/- रुपये)
-
एक मोबाईल (किंमत अंदाजे १०,०००/- रुपये)

-
नगदी (किंमत अंदाजे २१,३००/- रुपये)
-
एकूण जप्त मुद्देमाल: २,२१,३००/- रुपये
मार्गदर्शन व कामगिरी:
सदरची यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त (परिमंडळ ०१) यशवंत सोळंके, पोलीस उपायुक्त (परिमंडळ ०२) श्याम घुगे, पोलीस उपायुक्त (मुख्यालय तथा गुन्हे) प्रांजली सोनवणे आणि सपोआ (गुन्हे) निलेश ब्राम्हणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पो.नि. अतुल वर व पो.नि. दिनेश दहातोंडे यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने पार पाडली.




