अमरावती: दरोड्याची तयारी करणाऱ्या ७ जणांना अटक; ३.२८ लाखांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow


अमरावती: दसरा मैदानातील दरोड्याचा डाव गुन्हे शाखेने उधळला; ७ संशयितांना वाहनांसह अटक, ३.२८ लाखांचा मुद्देमाल जप्त

अमरावती (प्रतिनिधी): राजापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दसरा मैदान परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सात संशयित आरोपींना अमरावती शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने सापळा रचून ताब्यात घेतले आहे. ही कारवाई १९ नोव्हेंबर २०२६ रोजी करण्यात आली असून, आरोपींकडून हत्यारे, दरोड्याचे साहित्य आणि वाहने असा एकूण ३,२८,६२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

घटनेचा तपशील

१९ नोव्हेंबर २०२६ रोजी गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, सात संशयित व्यक्ती तोंडाला दुपटे बांधून, धारदार शस्त्रे व रॉड घेऊन अंधारात दसरा मैदानावर वाहनांसह दरोड्याच्या उद्देशाने एकत्र आले आहेत. यातील काही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली.



माहितीची खातरजमा केल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने रवी नगर रोडमार्गे दसरा मैदान परिसरात जाऊन पाहणी केली. तेथे झाडाझुडपांचा आधार घेऊन तोंडाला दुपटे बांधून लपून बसलेले सात संशयित पोलिसांना आढळून आले. गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ सापळा रचून त्यांना घेराव घातला. पोलिसांची चाहूल लागताच संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पथकाने पाठलाग करून सातही जणांना त्यांच्या वाहनांसह जागीच ताब्यात घेतले.



जप्त केलेला मुद्देमाल

ताब्यात घेतलेल्या आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याकडून खालील साहित्य जप्त करण्यात आले:



  • मिरची पावडरचे पॅकेट

  • लोखंडी टॉमी व लोखंडी रॉड



  • लाकडी लाठी व दोरी

  • ०४ चायना चाकू



  • मोबाईल फोन व वाहने

या सर्व साहित्याची एकूण किंमत ३,२८,६२० रुपये इतकी आहे. याप्रकरणी राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१०(४) आणि ३१०(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताब्यातील आरोपी व त्यांच्यावरील दाखल गुन्हे

अ.क्र. आरोपीचे नाव व पत्ता पूर्वीचे दाखल गुन्हे
१ सारंग रामदास धोटे (वय २६ वर्षे), रा. हनुमान मंदिराजवळ, रवी नगर, अमरावती पो.स्टे. फ्रेजरपुरा: १) अप.क्र. १०५६/२०२४ (कलम ११८(२), ३५२ BNS) २) ८४/२२ (कलम २९७, ५०६, ३२३, ३४ भा.दं.वि.)
२ रोहित गजानन जगताप (वय २६ वर्षे), रा. अंबा विहार, रवी नगर, अमरावती पो.स्टे. गाडगे नगर: १) २७५/२०२३ (कलम १४३, ४४७, १८८, १३५) पो.स्टे. राजापेठ: २) २६५/२०२१ (कलम १३५ म.पो.का.) ३) ५४८/२०१९ (कलम २९४, ३२३, ५०६, ३४ भा.दं.वि.) ४) ४७१/२०२० (कलम ४५४, ४५७, ३८० भा.दं.वि.)
३ सौरभ राजेश पळसकर (वय २६ वर्षे), रा. हनुमान मंदिराजवळ, रवी नगर, अमरावती पो.स्टे. राजापेठ: १) ४७१/२०२० (कलम ४५४, ४५७, ३८० भा.दं.वि.) २) ४८९/२०२४ (कलम ३२४, ३२३, ५०४, ३४ भा.दं.वि.) ३) २४३/२०१९ (कलम ३२४, ३४ भा.दं.वि.)
४ कार्तिक संजय ढोके (वय २० वर्षे), रा. हनुमान मंदिराजवळ, रवी नगर, अमरावती पो.स्टे. राजापेठ: ४५८/२०२४ (कलम ११७(२), ११८(२), ३५२, ३(५) BNS)
५ समर्थ उमेशराव कळसकर (वय २० वर्षे), रा. हनुमान मंदिराजवळ, रवी नगर, अमरावती पो.स्टे. राजापेठ: ३८७/२०२५ (कलम १०९, ११५(२), ३(५) BNS)
६ प्रतिक मनोहर कुशराम (वय २६ वर्षे), रा. रवी नगर, इंद्रपुरी गल्ली, गणेश नगर, अमरावती —
७ सुदर्शन भाऊराव वानखडे (वय २७ वर्षे), रा. हनुमान मंदिराजवळ, रवी नगर, अमरावती —

कोणाच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाई?

ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त (परिमंडळ ०१) यशवंत सोळंके, पोलीस उपायुक्त (परिमंडळ ०२) श्याम घुगे, पोलीस उपायुक्त (मुख्यालय तथा गुन्हे) प्रांजली सोनवणे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) निलेश ब्राम्हणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल वर व पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे यांच्या नेतृत्वात पोउपनि गजानन सोनुने, पोउपनि राहुल महाजन यांच्यासह पोलीस अंमलदार सुनिल लासुरकर, दिपक सुंदरकर, गजानन ठेवले, आस्तिक देशमुख, मनोज ठोसर, मंगेश परिमल, सचिन बहाळे, जहीर शेख, मिर्झा नईम बेग, अतुल संभे, विकास गुडधे, विशाल वाकपांजर, योगेश पवार, राजीक रायलीवाले, चेतन गुल्हाणे तसेच चालक संदीप खंडारे, राहुल दुधे आणि मोहन साबे यांनी ही कारवाई केली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!