पर्यटनस्थळी गोंधळ घालणाऱ्यांवर सहाय्यक पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांचे पथकाची कार्यवाही…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

लोनावळा(पुणे ग्रामीण) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की
लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांनी स्वतः पथकासह लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याचे हद्दीमधील मौजे आतवण ता. मावळ जि. पुणे गावचे हद्दीधील टायगर पॉईंट या पर्यटन स्थळावर दि. १९/११/२०२३ रोजी ०१:०० वा. चे सुमारास वेळेचे निर्बंध न पाळता ४ टपरी व्यवसायिकांनी
आपला व्यवसाय चालू ठेवलेल्या स्थितीमध्ये मिळून आल्याने त्यांचेविरुध्द महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३३(डब्ल्यू) अंतर्गत तसेच सदर ठिकाणी पर्यटनाकरीता आलेले १४ पर्यटक गोंधळ करुन शांतता भंग करीत असताना मिळून आल्याने त्यांचे विरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदयातर्गत कारवाई करण्यात आली आहे.
यापूर्वीही याच ठिकाणी अशाप्रकारे कारवाई करण्यात आली असून यापुढेही सदर ठिकाणी व्यवसाय करणारे व्यवसायिकांनी वेळेचे निर्बंध पाळून सकाळी ०६:०० वा. पासून ते सायंकाळी ७:०० वाजेपर्यंत आपला व्यवसाय करावा. पर्यटनाकरीता आलेल्या पर्यटकांनी कोणत्याही प्रकारे गोंधळ गोंगाट करुन सार्वजनीक शांतता भंग करु नये व कोणीही दारुचे सेवन करुन वाहन चालवू नये असे लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक
सत्यसाई कार्तीक यांनी आवाहन केले आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक  अंकित गोयल यांचे मार्गदर्शनाखाली, सत्यसाई कार्तीक, सहा. पोलिस अधीक्षक, लोणावळा विभाग लोणावळा, व त्यांचे पथकामधील सहा. पोलिस
निरीक्षक सचिन राउळ, पो.हवा. अंकुश नायकुडे, म. पो. हवा. आशा कवठेकर, पो. शि. अंकुश पवार, सुभाष शिंदे,लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनचे  पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, पो.हवा. नितीन कदम, पो. शि. केतन तळपे, राहुल खैरे, नागेश कमठणकर, लोणावळा शहर पोलिस स्टेशनकडील पोलिस
उपनिरीक्षक लतीफ मुजावर, पो. शि भुषण कुवर, कामशेत पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पो. शि अमोल ननवरे, वडगांव मावळ पोलिस स्टेशनचे महिला पोलिस उपनिरीक्षक रुतुजा मोहिते, पो.हवा.सचिन गायकवाड, पो. शि. चेतन कुंभार यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!