
अकोला रेल्वे पोलिसांनी कुख्यात गुंडास केले MPDA कायद्यान्वये केले वर्षभराकरीता स्थलांतरीत…
अकोला येथील कुख्यात गुंडाविरूध्द रेल्वे पोलीसांची एम.पी.डी.ए.अॅक्ट अन्वये कारवाई एक वर्षाकरीता स्थानबध्द…
अकोला – सवीस्तर व्रुत्त असे की,पुरपिडीत कॉलणी, अकोट फैल, अकोला येथे राहणारा कुख्यात गुंड रिझवान शहा उर्फ डीएम. वल्द इरफान शहा वय २५ वर्षे, याचे वर यापुर्वी चो-या करणे, जबरी चोरी करणे, शस्त्रानिशी दुखापत करणे, शिवीगाळ करणे, मारहाण करणे असे बरेच गंभीर गुन्हे दाखल आहेत.त्याचे वर यापुर्वी विवीध कलमान्वये प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली होती, परंतु तो प्रतिबंधक कार्यवाही करून सुध्दा जुमानत नसल्याने त्याचे विरूध्द गंभीर दखल घेण्यात येवुन कुख्यात गुंड रिझवान शहा उर्फ डीएम इरफान शहा, याचे गुन्हेगारी वृत्तीस आळा बसावा याकरीता डॅा अक्षय शिंदे पोलिस अधीक्षक, लोहमार्ग नागपुर यांनी त्यास स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव मा. जिल्हादंडाधिकारी,
अकोला यांना सादर केला होता. मा. जिल्हादंडाधिकारी, अजित कुभांर यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून तसेच स्वतःचे स्त्रोताव्दारे माहीती मिळवुन सदर कुख्यात गुंड हा
धोकादायक व्यक्ती असल्याची खात्री झाल्याने त्यास एकवर्षा करीता अकोला जिल्हा कारागृहात स्थानबध्द ठेवण्याबाबतचा आदेश दि. ०७ / १२ / २०२३ रोजी पारीत केला. मा. जिल्हादंडाधिकारी, अकोला यांचे आदेशावरून रिझवान शहा उर्फ डीएम. इरफान शहा, याचा तात्काळ शोध घेवुन त्यास सदरचा आदेश तामील करून त्यास दिनांक ०८/१२/२०२३ रोजी जिल्हा कारागृहात स्थानबध्द केले.
सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक, डॉ. अक्षय शिंदे यांचे
मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक, वैशाली शिंदे, तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी, लोहमार्ग उपविभाग, अकोला पाडुरंग सोनवणे तसेच रेल्वे पोलिस स्टेशन अकोला येथील सहा.
पोलिस निरीक्षक अर्चना गाढवे, तसेच पो.स्टे. तील पोहेकॉ/ दावर खान, पोकॉ/ अतिकेश काळमेघ यांनी परिश्रम घेतले. रेल्वे स्टेशन, अकोला परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहुन शांतता
रहावी याकरीता अशा प्रकारचे गुन्हे करणारे व कारवाईस न जुमानणा-या सराईत गुन्हेगारांची माहीती संकलीत करण्यात आली असुन त्यांचे विरूध्द एम. पी.डी.ए. अॅक्ट खाली कार्यवाही
प्रस्तावति आहे




