
शेतीत गांजाची लागवड करणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,१ कोटीचा गांजा केला जप्त..
पोलिस स्टेशन लोणार हद्दीत शेतीत अंमली पदार्थ- गांजा बाळगणाऱ्या घेतले ताब्यात,14 क्विंटल ओलसर गांजा किं.1,40,27,700/-रु. चा मुद्देमाल हस्तगत, स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा यांची कारवाई…..
लोणार(बुलढाणा)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की,बुलढाणा जिल्ह्यामध्ये “अंमली औषधी द्रव्ये व मनः प्रभावी पदार्थ” याचे उत्पादन करुन, जवळ बाळगून, चोरटी वाहतूक, विक्री करणाऱ्या ईसमांचा शोध घेवून, त्यांचेवर “अंमली औषधीद्रव्ये व मनःप्रभावी
पदार्थ अधिनियम” कायद्यानुसार कारवाई करणे बाबत सुनिल कडासने, पोलिस अधीक्षक, बुलढाणा यांनी आदेशीत केले होते. त्याअनुषंगाने पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अशोक लांडे यांनी त्यांचे अधिनस्त पोलिस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक तयार करून, त्यांना अंमली औषधीद्रव्ये व मन: प्रभावी
पदार्थांचे उत्पादन करणारे, ते जवळ बाळगून वाहतूक करणाऱ्या इसमांचा शोध घेवून त्यांचेवर कायदेशीर कारवाई करनेबाबत सुचना दिल्या होत्या.त्यानुसार दि. 13/12/2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, पो.स्टे. लोणार हद्दीतील ग्राम हत्ता शिवार सर्वे नं. 181 येथे अनिल धुमा चव्हाण या ईसमाने त्याच्या मालकीच्या शेतामध्ये अवैधरित्या गांजाची लागवड केली असून, विक्री करण्याच्या उद्ददेशाने तो अंमली पदार्थ गांजा ताब्यामध्ये बाळगून आहे. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पो.स्टे. लोणार हद्दीतील अनिल धुमा चव्हाण यांचे ग्राम हत्ता शिवार सर्वे नं. 181 येथील शेतामध्ये पंचासमक्ष रेड केली असता, नमुद आरोपी याने शेतामध्ये चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने गांजा अंमली पदार्थाची लागवड, साठवणूक केली असल्याचे दिसून आले. नमुद आरोपी अनिल धुमा चव्हाण याचे विरुध्द अंमली औषधीद्रव्ये व मनः प्रभावी पदार्थ ओलसर गांजा जवळ बाळगल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली. आरोपी अनिल धुमा चव्हाण वय 45 वर्षे रा. हता ता. लोणार जि. बुलढाणा यांचे ताब्यातून ओलसर गांजा 14 क्विंटल किंमत 1,40,27,700/-रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. प्रकरणी आरोपी अनिल धुमा चव्हाण वय 45 वर्षे रा. हता ता. लोणार याचे विरुध्द पो.स्टे. लोणार येथे अंमली औषधीद्रव्ये व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम कलम 20 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्ह्याचा पुढील तपास प्रभारी अधिकारी पो.स्टे. लोणार यांचे मार्गदर्शनाखाली लोणार पोलिस करीत आहेत.
सदरची कारवाई सुनिल कडासने पोलिस अधीक्षक बुलढाणा यांचे आदेशान्वये अशोक थोरात-अपर पोलिस अधीक्षक खामगांव, .बी महामुनी, अपर पोलिस अधीक्षक- बुलढाणा, गुलाबराव वाघ उपविभागिय पोलिस अधिकारी बुलढाणा, प्रभार मेहकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अशोक लांडे प्रभारी अधिकारी स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा यांचे नेतृत्वात, पोलिस निरीक्षक राजेश शिंगटे पो.स्टे. मेहकर, पोनि. निमिष मेहेत्रे पो.स्टे. लोणार, सपोनि. सदानंद सोनकांबळे पो.स्टे. बिबी, सपोनि. नंदकिशोर काळे, निलेश सोळंके, पोउपनि. सचिन कानडे, पोहवा शरद गिरी, दिपक लेकुरवाळे, दिनेश बकाले, राजकुमार राजपूत,नापोशि गणेश पाटील, पुरुषोत्तम आघाव, गजानन दराडे, सतीश हाताळकर, मपोना. वनिता शिंगणे,पोशि अमोल शेजोळ, वैभव मगर, मनोज खरडे, दिपक वायाळ, चालक पोहेकॉ. शिवानंद मुंडे, चापोशि विलास भोसले सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा – बुलढाणा यांच्या पथकांनी पार पाडली.


मागील ३ महीण्यात. स्थानिक गु्न्हे शाखा,बुलढाणा यांनी अंमली पदार्थविरोधात धडक मोहीम उघडून N.D.P.S. ACT अन्वये गुन्हा मनःप्रभावी पदार्थ अधिनियम कलम 8, 20, 29 खालीलप्रमाणे गांजा जप्त केला…

1) लोणार पो.स्टे दिनांक 13.12.2023 आरोपी अनिल धुमा चव्हाण
वय 45 वर्षे रा. हता ता. लोणार जि.बुलढाणा यांचे ताब्यातुन 14 क्विंटल गाजा अंदाजे किंमत 1,40,27,700/-₹
2) धाड पो.स्टे.दिनांक 09/11/2023 आरोपी राहूल गोटीराम साबळे वय 27 वर्षे, रा. कुन्हा, ता.मोताळा जि.बुलढाणा+01 यांचे ताब्यातुन 459 किलो 400 ग्राम गांजा तसेच एक वाहन असा एकुन 1,14,08,000/-₹
(3) मेहकर पो.स्टे.दिनांक 06/10/2023 आरोपी 1) अब्दुल
गफुर रशिद वय 32 वर्षे रा.जाफरचाळी जुना जालना,मो.आबीद मो.सादीक वय 35 वर्ष रा. आलेगाव ता. पातुर जि. अकोला यांचे ताब्यातुन 43 किलो 200ग्रॅम व एक ट्रक असा एकुन 23,64,000/-₹

असा एकुन 2,77,99,711/-₹ चा मुद्देमाल जप्त केला


