
सभाग्रुहाचे बांधकामासाठी आणलेली वाळु चोरणार्यास राळेगाव पोलिसांनी केले जेरबंद…
राळेगाव(यवतमाळ) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की, दि.22/12/2023 रोजी पोस्टे राळेगाव येथे फिर्यादी संजय मांचावार रा. कोपरी यांनी तोंडी तक्रार दिली की गांधी लेआऊट मध्ये गुघाने ईंन्फ्रास्च्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तर्फे श्री संत तुकाराम महाराज सभागृहाचे बांधकाम सुरू असून त्या कामासाठी रेती साठवलेली होती त्या साठवलेली रेती मधून 10 ते 12 ब्रास रेती कीं.40,000 रु. ची दी.20/12/2023 रोजी रात्री दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली बाबत पोस्टेला अप क्रमांक 764/23 कलम 379 भा. द वी चा नोंद केला होता
सदर गुन्ह्याचे तपासात गोपनीय बातमीदार लावून दोन आरोपी 1)निखिल विनोद पावडे रा. राळेगाव,2)श्रीकांत परसराम थुटूरकर रा. रावेरी यास अटक करून सदर गुन्ह्यातील चोरी गेलेली रेती 10 ब्रास किंमत अंदाजे 40,000 रुपये व गुन्ह्यात वापरलेले ट्रॅक्टर ट्रॉली किमंत अंदाजे 5,00,000 रुपये असा एकूण 5,40,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्यात आणखी काही आरोपींचा सहभाग असून आरोपींचा शोध घेण्यात येत असून गुन्ह्याचा तपास सुरू आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक डॉ पवन बनसोड .अपर पोलिस अधीक्षक पियुष जगताप .उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वेंजने पांढरकवडा,पोलिस निरीक्षक रामकृष्ण जाधव पो स्टे राळेगाव यांचे मार्गदर्शनात पोउपनि निलेश गायकवाड, पोहवा गोपाल वास्टर, नापोशि सुरज चिवाने, पोशि प्रशिक यांनी केली असून गुन्ह्याचा तपास सुरू आहे.




