
रामनगर टाटा शोरूम चोरीचा छडा: २०.५७ लाखांच्या मुद्देमालासह उमरेडचा आरोपी अटकेत
रामनगर येथील टाटा शोरूममधील लॉकर चोरीचा छडा; २० लाख ५७ हजारांच्या मुद्देमालासह उमरेडचा आरोपी अटकेत
चंद्रपूर शहरातील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टाटा शोरूममधील गोदरेज लॉकर फोडून रोख रक्कम पळवणाऱ्या सराईत आरोपीला बेड्या ठोकण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) चंद्रपूर शहर पथकाला यश आले आहे. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ही धडक कारवाई करत अवघ्या काही वेळातच गुन्ह्याची उकल केली आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर शहर पथकाने तात्काळ समांतर तपास सुरू केला. तपासादरम्यान गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयिताचा शोध घेण्यात आला. या माहितीवरून पथकाने संशयित आरोपी प्रथम प्रभाकर दडमल (वय २४ वर्षे, रा. उमरेड, जि. नागपूर) यास ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली.

आरोपीकडून चोरीतील नगदी ₹५७,१४०/- आणि गुन्ह्यात वापरलेली २० लाख रुपये किंमतीची ‘टाटा हॅरियर’ गाडी असा एकूण ₹२०,५७,१४०/- (वीस लाख सत्तावन्न हजार एकशे चाळीस रुपये) किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीला पुढील कायदेशीर कारवाई व तपासासाठी रामनगर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
-
पोलीस ठाणे: रामनगर (चंद्रपूर)

अपराध क्रमांक: ९७४/२०२६
-
लागू कलमे: ३०५, ३३१(४) BNS (भारतीय न्याय संहिता)
अटक आरोपी: प्रथम प्रभाकर दडमल (वय २४ वर्षे, रा. उमरेड, जि. नागपूर)
-
जप्त मुद्देमाल: नगदी ₹५७,१४०/- व टाटा हॅरियर कार (किंमत ₹२० लाख) — एकूण किंमत ₹२०,५७,१४०/-

-
तपास पथक: उपविभाग चंद्रपूर शहर व स्थानिक गुन्हे शाखा (LCB), चंद्रपूर





