
नायलॉन मांजा विक्री प्रकरणी राजापेठ पोलिसांनी केली दोघांना अटक…
नायलॉन मांजा विक्री प्रकरणी दोघांना अटक..
अमरावती (प्रतिनिधी) – नववर्ष आगमन व संक्रात सण मोठ्या उत्सहात साजरा होतो. त्या निमीत्त मोठ्या प्रमाणात आकाशात पतंग उडविले जातात. परंतू त्यासाठी घातक असा नायलॉन मांजा वापरण्यात येतो. नायलॉन मांजामुळे रोडवरून जाणा-या सामान्य नागरिकांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. तर कित्येक वेळा प्राणही गमवावे लागले आहे. झाडांमध्ये आडकलेल्या मांज्यामुळे कित्येक वेळा पक्षांचे जिव गेले आहेत. नायलॉन मांजावर न्यायालयाने बंदी घातलेली आहे. परंतु तरीही काहीजण अशा नायलॉन मांजाची बेकायदेशिर रित्या चोरून विक्री करतात.


राजापेठ पोलिस ठाणे हद्दीत पोलिसांचे पथक हे अवैध धंदे, घरफोडी, चोरी, यां सारख्या गुन्ह्यांची माहिती काढून कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना खात्रीलायक माहिती मिळाली की, अमरावती मध्ये दोन इसम हे अवैध्दरित्या कृत्रीम लेप लावलेले वेगवेगळे नायलॉन मांजे हे विक्रीच्या उद्देशाने जवळ घेवुन उभे आहेत. अशी माहिती मिळताच पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन मुद्देमालासह आरोपींना अटक केली.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, दि.28डिसेंबर रोजी 11.30 वा.सु. तक्रारदार पोलिस हवालदार पोलिस पथकासह पोलिस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलींग करीत असताना गुप्त बातमीदारा कडुन माहीती मिळाली की, समर्थ शाळेच्या बाजुने, बडनेरा रोड, अमरावती येथे दोन इसम हे अवैध्दरित्या कृत्रीम लेप लावलेले वेगवेगळे नायलॉन मांजे विकीसाठी जवळ घेवुन उभे आहेत. अशा मिळालेल्या माहीती वरून आरोपी नामे 01) सिध्देश किशोर कोंबे, (वय 19 वर्ष), रा.महालक्ष्मी नगर, अमरावती 02) सुरज श्रिराम चुंबलवार, (वय 27 वर्ष), रा.महादेव नगर, अमरावती यांना ताब्यात घेवुन त्यांचे कडुन

1) 10 नग मोनो काईट कंपनीचे नायलॉन मांजा चक्कर प्रत्येकी 500 रूपये, काळया रंगाचे 03 नग मोनो काईट कंपनीचे नायलॉन मांजा चक्कर प्रत्येकी 500 रूपये
2) 5 नग मोनो काईट कंपनीचे नायलॉन मांजा चक्कर प्रत्येकी 500 रूपये
3) 4 नग मोनो काईट कंपनीचे नायलॉन मांजा चक्कर प्रत्येकी 500 रूपये पिवळ्या रंगाचे
4) 2 नग मोनो काईट कंपनीचे नायलॉन मांजा चक्कर प्रत्येकी 500 रूपये जांभळ्या रंगाचे
5) 2 नग मोनो काईट कंपनीचे नायलॉन मांजा चक्कर प्रत्येकी 500 रूपये हिरव्या रंगाचे
6) 1 नग मोनो काईट कंपनीचे नायलॉन मांजा चक्कर प्रत्येकी 500 रूपये लाल रंगाचा, 02 नग मोनी काईट कंपनीचे नायलॉन मांजा चक्कर प्रत्येकी 500 रूपये फिक्कट ऑरेंज
7) 1 नग मोनो काईट कंपनीचे नायलॉन मांजा चक्कर प्रत्येकी 500 रूपये मेहदी रंगाचा
8) 1 नग निळ्या रंगाचा नायलॉन मांजा असलेला चक्कर प्रत्येकी 700 रूपये असा एकूण जवळपास 17800रु. मुद्देमाल जप्त करून त्यांचे विरुध्द कलम 188 भादवी सहकलम 05 पर्यावरण संरक्षण अधी. सन 1986 अन्वये कार्यवाही करण्यात आली.
सदरची कारवाई ही नविनचंद रेड्डी पोलिस आयुक्त अमरावती शहर, सागर पाटील, पोलिस उपायुक्त परि- 2 अमरावती, शिवाजी बचाटे, सहायक पोलिस आयुक्त, अमरावती, यांच्या मार्गदर्शनाखाली सिमा दाताळकर, वरीष्ठ पोलिस निरीक्षक, पो.स्टे. राजापेठ अमरावती, पोहवा मनीष करपे, नापोशि रवी लीखीतकर,पंकज खटे, गनराज राउत, पोशि सागर मजगवरे, पंकज गाठे यांनी केली.


