गोमांस वाहतूक करणाऱ्यावर परंडा पोलिसांची कारवाई…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

गोमांस वाहतूक करणाऱ्यावर परंडा पोलिसांची कारवाई…

धाराशिव (प्रतिनिधी) – अवैधरीत्या बंदीस्त छुप्या पद्धतीने गोमांस वाहतूक प्रकरणी परंडा पोलीसांच्या पथकाने गुन्ह्यात निष्पन्न झालेल्या दोघांवर गुन्हा दाखल करुन वाहनासह एकुण ८ लाख ८६ हजार रु.मुद्देमाल जप्त केला आहे.





या बाबत सविस्तर वृत्त असे की, परंडा शहरात व परिसरात गोवंश जनावरांची अवैध कत्तल करणाऱ्यांविरुद्ध परंडा पोलीसांनी मोहीम हाती घेतली आहे. यापुर्वी परंडा पोलीसांच्या पुढाकारातून परंडा येथील अवैध कत्तलखाने जमीनदोस्त करण्यात आले होते. तथापि, चोरून लपून गोवंश जनावरांची कत्तल होत असल्यास त्याबाबत गोपनीय माहिती मिळविण्याकरीता गोपनीय यंत्रणा सक्रिय करण्यात आलेली आहे. याचाच एक भाग म्हणून आज भल्या पहाटे परंडा पोलिसांना प्राप्त गोपनीय माहितीनुसार गोमांसाची वाहतूक करणाऱ्या वाहनास पकडण्यात यश आले आहे. जुने तहसिल कार्यालयासमोर सापळा रचून गोमांसाची वाहतूक करणारे वाहन पकडण्यात आले. सदरील वाहनावर वाहन क्र. एमएच ४२ बीएफ २६६० नमूद आहे. वाहन चालक इम्रान मशीर शेख याला ताब्यात घेण्यात आले आहे. वाहनचालकाकडे आणखी सखोल चौकशी केली असता त्याने सांगितलं की तो स्वतः भिगवन येथील रहिवासी असून आजूबाजूच्या परिसरातून जिवंत जनावरे विकत घेतली जातात आणि त्यानंतर ती जनावरे परंडा येथे आणली जातात. परंडा येथे आल्यावर शाहबाज अजीज सौदागर यांच्या अवैध कत्तलखान्यावर त्या जनावरांची कत्तल केली जाते. चौकशीमध्ये आतापर्यंत दोन आरोपी निष्पन्न झालेले आहेत. सर्व आरोपींविरुद्ध गु.र.नं. ६६/२४ अन्वये कलम ४२९ भा.द.वि. सह कलम ५(सी), ९ (ए) महाराष्ट्र प्राणि संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदरील गुन्ह्यात वाहन आणि गोमांस असा एकूण ८,८६,०००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदरील गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण घोंगडे करीत आहेत.



अशा प्रकारे सदरील कारवाई ही पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक गोहर हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी भुम गौरीप्रसाद हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जतपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक कविता मुसळे, पोलीस उपनिरीक्षक किरण घोंगडे, महिला पोलीस हवालदार पायाळे, पोलीस हवालदार फिरोज शेख, नाईक पोलीस अंमलदार नितीन गुंडाळे, पोलीस अंमलदार श्रीकांत गायकवाड, पोलीस अंमलदार जगदाळे पोलीस अंमलदार डिकोळे, यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!