हिंगोली स्थागुशा पथकाने उघड केला JCB चोरीचा गुन्हा…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

बसमत  हददीतील जे.सी.बी. चोरीचा गुन्हा उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश जे.सी.बी. चोरी करून विक्री करणारे व विकत घेणारे अशा 03 आरोपींना अटक करुन20 लाख रू. किंमतीची जेसीबी हस्तगत….

बसमत(हिंगोली)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
पोलिस स्टेशन वसमत ग्रामीण हददीतील मौ. इंजनगाव पुर्व शिवारातील आखाडयावर फिर्यादी नामे- अंबादास भोरे रा. आडगाव लासीना यांचे मालकिची डी.एस्क. कंपनीची जे.सी.बी. मशीन किंमत २० लाख रूपये ठेवलेली असतांना कोणीतरी अज्ञात आरोपींनी नमुद जे.सी.बी. चोरी करून नेली होती. सदर जे.सी.बी. चा फिर्यादी यांनी आजुबाजुला शोध घेतला परंतु मिळुन आली नाही. फिर्यादी यांनी त्याबाबत पोलिस स्टेशन बसमत ग्रामीण येथे दिलेल्या फिर्याद वरून पोलिस स्टेशन नमुद जे.सी.बी. चोरी बाबत गुरनं. ११२/२०२४ कलम ३७९ भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नमुद फिर्यादी यांचे चोरीला गेलेली जे.सी.बी. तात्काळ शोधुन काढुन गुन्हयातील सहभागी आरोपी पकडणे बाबत पोलिस अधीक्षक हिंगोली  जी. श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सुचना दिल्या होत्या.





त्यावरून स्था. गु.शा. पोनि विकास पाटील यांचे मार्गदर्शनात स्थागुशा चे सपोनि राजेश मलपिलु आणि त्यांचे पथक नमुद यांनी
गुन्हयाच्या घटनास्थळी भेट देवुन तपासाची चक्रे गतीमान करून गोपनीय बातमीदार मदतीने तपास करत नमुदचा गुन्हा  संजय अंबादास इंगोले वय ३२ वर्ष रा. देगाव ता.पुर्णा यांनी त्यांचे ईतर साथिदारा मार्फत मिळुन केल्याबाबत पथकाला माहीती मिळाल्याने सपोनि राजेश मलपिलु आणि त्यांचे तपास पथकाने दिनांक- १५/०४/२०२४ रोजी आरोपी नामे- संजय अंबादास इंगोले यास ताब्यात घेवुन विचारपुस करता तपासात नमुद आरोपीने त्याचे ईतर साथीदार यांचेसह मिळुन गुन्हा केल्याची कबुली दिली.



तपास पथकाने गुन्हयात सहभागी ईतर ०२ आरोपी  अल्लाबक्ष
मेहबुब पठाण वय ३१ वर्ष रा. पाथरी जि.परभणी व युवराज उत्तम कठाळे वय ४० वर्ष रा. दहवंडी ता. शिरूर जि.बिड यांना ताब्यात घेवुन नमुद आरोपींच्या ताब्यातुन फिर्यादी यांचे चोरीला गेलेले डी. एस्क. कंपनीची जे.सी.बी. मशीन किंमत २०,००,००० रू ( वीस लाख रूपये ) जप्त करून नमुद तिन्ही आरोपींना जे.सी.बी. मशीनसह पुढील तपासकामी पो. स्टे.बसमत ग्रा. यांचे ताब्यात दिले आहे.
सदरची कार्यवाही  पोलिस अधीक्षक  जी. श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, स्थागुशा पोलिस निरीक्षक  विकास पाटील यांचे मार्गदशनाखाली सपोनि राजेश मलपिलु, पोलिस अंमलदार शेख बाबर,गजानन पोकळे, किशोर कातकडे, विठठल काळे, गणेश लेकुळे, तुषार ठाकरे, दिपक पाटील, दत्ता नागरे, अशोक काकडे यांनी केली







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!