
मोठी बातमी! वैजापूर रोहित पठारे खून प्रकरणात पोलिसांची धडक कारवाई; मुख्य आरोपीसह १६ जण गजाआड

वैजापूर रोहित पठारे खून प्रकरण: मुख्य आरोपीसह १६ जण गजाआड; तांत्रिक तपासाच्या आधारे आणखी सहा फरार आरोपींना बेड्या, एका अल्पवयीन बालकासही घेतले ताब्यात
नेमकी घटना काय? वैजापूर शहरात गणेशोत्सव २०२६ च्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन मंडळांमधील कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता. याच वादाच्या पुनरावृत्तीतून ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास वैजापूरच्या येवला रोड परिसरात दोन्ही गट आमनेसामने आले. यावेळी झालेल्या भीषण हाणामारीत तलवारी, लोखंडी रॉड आणि कुऱ्हाडींसारख्या प्राणघातक शस्त्रांचा वापर करण्यात आला. या हल्ल्यात रोहित अनिल पठारे (वय २३) हा तरुण गंभीर जखमी झाला होता, तर इतरही काही जण जखमी झाले होते. गंभीर जखमी झालेल्या रोहितला उपचारासाठी शिर्डी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि ३ नोव्हेंबर २०२६ रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
रोहितच्या मृत्यूची बातमी समजताच वैजापुरात संतापाची लाट उसळली होती. नातेवाईक आणि नागरिकांनी वैजापूर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात रास्ता रोको करत सर्व आरोपींना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. तसेच हा खटला जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक कोर्ट) चालवण्याची मागणी विविध स्तरांतून होत आहे.

कठोर कलमांन्वये गुन्हा दाखल: या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील अन्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांची धडाकेबाज कारवाई आणि अटकसत्र: घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड / प्रकाश जाधव यांच्या निर्देशानुसार आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अपराजिता अग्निहोत्री यांच्या देखरेखीखाली स्थानिक गुन्हे शाखा (LCB) व वैजापूर पोलिसांची ५ विशेष पथके तैनात करण्यात आली होती.

-
यापूर्वीची कारवाई: पोलिसांनी यापूर्वी खून प्रकरणात ८ आरोपींना (ज्यात शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी येथून लपून बसलेल्या मुख्य आरोपीचाही समावेश होता) आणि गुन्हा रजिस्टर क्रमांक ६९८/२०२६ मध्ये २ आरोपींना असे एकूण १० जणांना अटक केली होती.
-
नवीन कारवाई (दि. ९ नोव्हेंबर २०२६): तपासादरम्यान पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकत खालील ६ फरार आरोपींना अटक केली आणि एका अल्पवयीन बालकास ताब्यात घेतले:

-
अविनाश ऊर्फ अनिकेत पोपट होंड
-
ज्ञानेश्वर सिताराम वडाळकर

-
प्रतीक कैलास साळुंके
-
रोहित मच्छिंद्र आहेर
-
संकेत आदिनाथ आहेर
-
तुषार आदिनाथ आहेर (सर्व रा. वैजापूर)
-
या पथकाने केली कारवाई: ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव आणि प्रभारी अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अपराजिता अग्निहोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक तथा प्रभारी अधिकारी विनय सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव रणखांब, विठ्ठल झांजुर्णे, पोलीस उपनिरीक्षक लहुजी घोडे आणि पोलीस अंमलदार भारत निकाळजे, रामेश्वर ढाकणे, युवराज पाडळे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या गुन्ह्यातील उर्वरित फरार आरोपींचाही पोलीस कसोशीने शोध घेत आहेत.



