
खापरखेडा पोलिसांनी एकास मुद्देमालासह ताब्यात घेऊन उघड केले घरफोडीचे २ गुन्हे….
खापरखेडा पोलीसांनी संशईत ईसमास ताब्यात घेऊन उघड केले २ घरफोडीचे गुन्हे,. १ आरोपीसह ३ लाखाचा मुद्देमाल केला जप्त….
खापरखेडा(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक (११) रोजी खापरखेडा पोलिस परीसरात पेट्रोलींग करीत असतांना माहीती मिळाली की, चनकापुर येथे राहणारा
दिलीप पवरीया याचे घरी कुलुप तोडुन घरफोडी झाली आहे अशा माहीतीवरुन पोलिस स्टेशन खापरखेडा येथे घरफोडीचा गुन्हा नोंद करुन तपास सुरु होता


सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने गोपनीय माहीती माहीती प्राप्त झाली की सदरची घरफोडी ही रेकॅार्डवरील सराईत गुन्हेगार पुनीत भगत याने केली आहे अशी खात्रीशीर माहीती वरुन दहेगाव येथुन
पुनीत भगत यास ताब्यात घेवुन त्याला विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली तसेच त्याने वारेगाव येथे
घरफोडी केल्याचे सांगीतले त्याचे कडुन दोन घरफोडी मध्ये चोरी केलेले ०३ लाख रूपयाचे सोन्याचांदीचे दागिने जप्त करून आरोपी पुनीत उर्फ पुन्ना राजु भगत वय २२ वर्षे रा. जयभोले नगर चनकापूर यास अटक करण्यात आली. आरोपी याचेवर घरफोडी, चोरी व जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहे. पो.स्टे. खापरखेडा येथील डी. बी. पथकाला दोन घरफोडी उघड करण्यास व मुद्देमाल हस्तगत करण्यास यश प्राप्त झाले.
सदर कार्यवाही पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलिस अधीक्षक रमेश धुमाळ,उपविभागीय पोलिस अधिकारी कन्हान विभाग कन्हान संतोष गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार पोलिस स्टेशन खापरखेडा धनाजी जळक याचे नेतृत्वात मपोनी अमरदिप खाडे, फालगुन घोडमारे पोउपनी भारती नरोटे, प्रफुल राठोड, शैलेश यादव, राजु भोयर, मुकेश वाघाडे, कविता गोंडाने, राजकुमार सातुर दिपक रेवतकर, प्रदिप मने यांचे पथकाने पार
पाडली.



