अंमली पदार्थ विरोधी पथकाने गांजासह एकास घेतले ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

गुन्हेशाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाने गांजा बाळगणाऱ्या अटक करुन,२.८२ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…

नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दि.(२८) मे  चे मध्यरात्रीचे सुमारास, गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकास खात्रीशीर माहिती मिळाली की पोलिस ठाणे कपिलनगर हद्दीत कामठी रोड, उप्पलवाडी, जम–जम आईस फॅक्ट्री मागे, कश्यपचे घरा समोर, कपिलनगर, नागपूर येथे एक ईसम अंमली पदार्थ गांजा बाळगुन आहे अशा खात्रीशीर माहीतीवरुन सदर ठिकाणी पथकाने जाऊन बघीतले असता त्या ठिकाणी एक ईसम संशयास्पद स्थितीत आढळुन आला त्याचे जवळ जाऊन त्याची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव शुभम उर्फ विक्की रूपचंद शाहु वय २८ वर्ष असे सांगितले यावरुन त्याची झडती घेतली असता, त्याचे ताब्यातुन १४ किलो १२० ग्रॅम हिरव्या रंगाचा ओलसर गांजा किंमती २,८२,४००/- रू. चा मिळुन आला.





आरोपीचे ताब्यातुन गांजा, एक मोबाईल फोन असा एकुण
२,९७,४००/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीचे हे कृत्य कलम ८ (क), २०(ब) (२) (ब) एन.डी.पी.एस. अॅक्ट नुसार पोलिस स्टेशन कपिलनगर येथे गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. आरोपीस अटक करुन मुद्देमालासह पुढील कारवाई कामी कपिलनगर पोलिसांचे ताब्यात देण्यात आले.



सदरची कामगिरी पोलिस आयुक्त डॅा रविंद्र सिंघल,सह पोलिस आयुक्त अस्वती दोरजे,अपर पोलिस आयुक्त (गुन्हे,)संजय पाटील पोलिस उपायुक्त (डिटेक्शन)निमीत गोयल,सहा. पोलिस आयुक्त (गुन्हे)डॅा अभिजित पाटील,यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हेशाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रभारी पोलिस निरीक्षक. राहुल शिरे, सपोनि. मनोज घुरडे, पोहवा. विजय यादव, नितीन सांळुखे, नापोशि. पवन गजभिये, पोशि शेषराव रेवतकर, सहदेव चिखले, मपोहवा. अनुप यादव यांनी केली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!