
कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशीय बैल जातीच्या जनावरांची स्थानिक गुन्हे शाखेने केली सुटका…
कत्तलीसाठी जाणारे गोवंशीय जनावरांना स्थानिक गुन्हे शाखेने दिले जिवनदान,३ गोवंश(बैल) जातीच्या जनावरांची केली सुटका…
हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,बकर ईद सणाचे पार्श्वभुमीवर पोलिस अधिक्षक, जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयात कत्तलीसाठी होणारी अवैध गोवंश वाहतुक रोखण्यासाठी प्रभावी कार्यवाही करण्याचे आदेश स्था.गु.शा.चे पोलिस निरीक्षक विकास पाटील यांना दिले होते.


त्या अनुषंगाने दि (१५) रोजी स्थागुशाचे सपोनि. शिवसांब घेवारे यांचे पथक पोलिस स्टेशन,बासंबा हददीत पेट्रोलिंग करीत असताना एक पांढ-या रंगाचे पिकअप आर.टि.ओ. पासींग क. एमएच २२ ए ए ६१६१ चारचाकी वाहनात गोवंशाची कत्तलीसाठी पिकअपमध्ये टाकुन चिंचोली महादेव मार्गे खानापुर कडे येत असल्याबाबत गोपनिय बातमीदारामार्फत खात्रीशिर माहीती मिळाल्याने, पोलिस पथक तात्काळ त्या दिशेने रवाना होवुन पो.स्टे. बासंबा हद्दीतील मौजे अंभेरी गावाजवळ रोडवर सदरील वाहनास, त्यामधील असलेले एकुण ०३ गोवंश (बैल) ची कत्तल करण्याच्या हेतुने निर्दयीपणे व दाटीवाटीने वाहतुक करतांना ताब्यात घेवुन एकुन किं ७,८८,०००/- रू मुद्देमाल जप्त करून, अवैध गोवंश वाहतुक करणारे दोन इसमांविरूध्द पो.स्टे. बासंबा येथे कलम ११ (१) (ड) (ई) प्राण्यांस निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध कायदा १९६० सह कलम ५ (अ), ५ (ब), ९, ११ महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम १९९५ तसेच कलम ८३/१७७, १३०/१७७ मो.वा. का. सह कलम १०९ भादंवी. प्रमाणे सपोनि शिवसांब घेवारे यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर,.अपर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, पो.नि.स्थागुशा विकास पाटील, स्था.गु.शा. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि. शिवसांब घेवारे, पोलिस अंमलदार नितीन गोरे, आजम प्यारेवाले, नरेंद्र साळवे, हरिभाऊ गुंजकर, प्रशांत वाघमारे, स्था.गु.शा. पथक, हिंगोली यांनी केली आहे.



