ICICI होम फायनान्स दरोडा प्रकरणी एका आरोपीस गुजरात राज्यातुन गुंडाविरोधी पथकाने घेतले ताब्यात..

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

आयसीआयसीआय होम फायनान्स मधील कोटयावधीच्या सोण्याच्या दागिण्यावर डल्ला मारणाऱ्या आरोपीला गुंडा विरोधी पथकाने गुजरात मधुन ठोकल्या बेडया…..

 







 



नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दि.(०४) रोजी सरकारवाडा पोलिस ठाणे हद्धीत आयसीआयसीआय फायनान्स कंपनी लिमीटेड शाखा जुना गंगापुर नाका नाशिक येथे गोल्ड लोन सव्र्हस असोशिएट किरण जाधव हे ग्राहकाचे सोन्याचे दागिने कंपनीचे सेप्टी लॉकरमध्ये ठेवण्यासाठी गेले असतांना त्यांना लॉकर हा पुर्णपणे रिकामा असल्याचे दिसले. त्यावेळी समजले की २ अनोळखी इसमांनी एकुण २२२ ग्राहकांचे अंदाजे ४ कोटी ९२ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले बाबत सरकारवाडा पोलिस ठाणे गुन्हा रजि. नं. १३२/२०२४ भादंवि ४५७, ३८०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचे तपासात यातील मुख्य आरोपी व सध्या नाशिक ग्रामीण वाडीवर्हे येथील खुनाच्यया गुन्ह्यात मध्यवर्ती काराग्रुहात असणारा वैभव लहामगे याने त्याचे साथीदार व सदर बॅकेत वॅाचमनची म्हनुन नोकरी करणारा तुकाराम गोवर्धने याच्या मदतीने सदर बॅंकेत रेकी करुन यातील आरोपी रतन जाधव, सतिष चौधरी, अर्जुन पाटील यांचेसोबत संगनमताने हा गुन्हा केल्याचे निष्पन्न  निष्पन्न झाल्याने आरोपी रतन जाधव, सतिष चौधरी, अर्जुन पाटील हे फरार होते.
पोलिस आयुक्त संदीप कर्णीक यांनी वरील गुन्हयांचे गांभिर्य पाहून गुन्हयातील फरार आरोपींना अटक करण्याबाबत गुंडा विरोधी पथकास आदेशीत केले होते. त्यावरुन पोलिस उपायुक्त(गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहा पोलिसआयुक्त (गुन्हे), संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहा. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते व पथक यांनी आरोपी यांचे हालचालीची माहिती घेतली असता आरोपी रतन जाधव व सतिश चौधरी यांनी मागील १५-२० दिवसापुर्वी स्विफ्ट कार खरेदी करुन ते आंध्रप्रदेश, कर्नाटक, राजस्थान येथे फिरुन सध्या गुजरात राज्यात असल्याबाबत माहिती मिळाली. आरोपी गुजरात येथे असल्याने पोलिस उपायुक्त(गुन्हे) प्रशांत बच्छाव यांनी गुंडा  विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते, पोलिस अंमलदार विजय सुर्यवंशी, प्रदिप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, प्रविण चव्हाण यांना दिनांक १६/०६/२०२४ रोजी गुजरात राज्यात तात्काळ रवाना केले. गुंडा विरोधी पथक गुजरात मधील हलोल शहर येथे गेल्यावर संपुर्ण परिसरातील हॉटेल, लॉजेस चेक केले परंतु आरोपींचा काहीएक ठावठिकाणा लागला नाही. दि. १७/०६/२०२४ रोजी आरोपींचा शोध घेत असतांना पोलिस पथकासमोरुन एक स्विफ्ट कार क्र. एम.एच. १२एच. व्ही. ०८१८ जातांना दिसले. त्यामध्ये डोक्यात टोपी घातलेले २ इसम दिसुन आले, पथकाला यापुर्वी माहिती मिळाली होती की, ८ दिवसापुर्वी आरोपी हे तिरुपती बालाजी येथून डोक्यावरील केस काढून आले आहे त्यावरुन पथकाचा संशय बळावल्याने पोलिस पथकाने आरोपीतांच्या वाहनाचा पाठलाग करून आरोपींना थांबण्याबाबत सांगितले परंतु आरोपींना पोलिस वाहनाचा सुगावा लागल्याने आरोपीतांनी पोलिस वाहनाला कट मारुन जोरात पुढे निघुन गेले त्यावेळी हलोल शहरातील हायवे रस्ता व गल्लीबोळातुन साधारण ८ ते १० किलोमिटर पोलिसांनी आरोपीतांचा सिनेस्टाईल पाठलाग केला परंतु पाठलाग सुरु असतांना शहराच्या बाहेर रस्ता बंद झाल्यावर जंगल सुरु  होते त्याठिकाणी आरोपींनी त्यांची गाडी सोडुन जंगलात पळुन गेले. त्याचवेळी गुंडा विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार हेही
आरोपीच्या मागे जंगलात जावुन आरोपीचा कसून शोध घेतला असता साधारण ३ तासानंतर जंगलातील झाडाझुडपाचा आडोसा
घेवुन लपुन बसलेला आरोपी  सतिश कैलास चौधरी वय २७ वर्षे रा. महाराणाप्रताप चौक सिडको नाशिक यास शिताफीने पकडले. गुंडा विरोधी पथकाने हलोल शहराच्या घनदाट जंगलातुन आरोपीला पकडुन आणल्यावर हलोल शहरातील स्थानिक नागरिक, स्थानिक पोलिस यांनी गुंडा विरोधी पथकाचे टाळया वाजवुन अभिनंदन केले त्याचप्रमाणे नाशिक शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णीक यांनी सुध्दा पोलिस अधिकारी यांचे कौतुक केले. आरोपीस पुढील तपासकामी सरकारवाडा पोलिस ठाणेचे ताब्यात दिले असुन पुढील तपास चालु आहे.तसेच गुजरात राज्यातुन ताब्यात घेतलेला आरोपी  सतीश याचेवर पोलिस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर १६९ / २०२४ भादंविक ३०२, ३४ वगैरे प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल असुन सदर गुन्हयात देखील तो फरार आहे.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णीक, पोलिस उपायुक्त(गुन्हे प्रशांत बच्छाव, सहा पोलिस आयुक्त(गुन्हे), संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहा. पोलिस निरीक्षक. ज्ञानेश्वर मोहिते, पोलिस अंमलदार विजय सुर्यवंशी, प्रदिप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, प्रविण चव्हाण, मलंग गुंजाळ, डी.के. पवार, राजेश सावकार, सुनिल आडके, गणेश भागवत, नितीन गौतम, गणेश नागरे, निवृत्ती माळी, सुवर्णा गायकवाड यांनी संयुक्तरित्या
कामगिरी पार पाडली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!