
जिवघेणा हल्ला करणाऱ्या फरार कुख्यात गुंडास MIDC भोसरी पोलिसांनी घेतले ताब्यात…
जिवघेणा हल्ला करुन फरार झालेल्या कुख्यात गुंडास त्याचे साथीदारांसह MIDC भोसरी पोलिसांनी घेतले ताब्यात….
पिंपरी-चिंचवड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,एम.आय.डी.सी भोसरी पोलिस स्टेशन हद्दीत दि.(२०) जुन २०२४ रोजी रात्रौ १०.१० वा. चे सुमारास मातोश्री बिल्डींग समोर, सेक्टर १२ एम. आय. डी. सी भोसरी, पुणे येथे फैज फहिम
शेख. रा. जाधववाडी, चिखली व त्याचा मित्र विशाल गौतम. रा. खंडेवस्ती, एमआयडीसी भोसरी पुणे. हे त्यांचे मोटर सायकलवरुन घरी जात असताना त्यांचे मोटरसायकलला यातील आरोपी अर्थव उदय पकाले,रा. पी.एम.आ.डी.ए वसाहत, सेक्टर १२ यानेत्याचे दोन साथीदारासह मोटारसायकल वरुन येवुन त्याची मोटारसायकल फैज शेख याचे मोटारसायकलला आडवी लावुन त्यांना थांबवले त्यावेळी मोटारसायकल वरुन आलेल्या सुरज रणदिवे रा. घरकुल, चिखली, पुणे याचेसोबतचे दोन अनोळखी इसम व तिस-या मोटारसायकल वरुन आलेल्या सोन्या ऊर्फ विवेक विनोद नाईक यांचेसोबत आलेल्या दोन अनोळखी इसमांनी येवुन त्यातील अथर्व पकाले याने फैज शेख यास तु मला सारखे पैसे मागुन त्रास देतो काय असे म्हणुन थांब आता तुला जिवंत सोडत नाही तुला ठार मारतो असे म्हणुन त्याचे हातातील लोखंडी रॉडने त्याचे डोक्यात ठिकठिकाणी जोराचा घाव घावुन गंभीर जखमी करुन जीवे
ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याचा मित्र सुरज रणदिवे, रा घरकुल, चिखली, पुणे, सोन्या ऊर्फ विवेक विनोद नाईक यांनी ही फैज शेख याच्या डोक्यास रॉडने मारुन गंभीर जखमी केले. व त्यांचे इतर साथीदारांनी जुने वादाच्या कारणावरुन त्यास लाथाबुक्यानी मारहाण करुन त्याचा मित्र विशाल गौतम याला शिवीगाळ व मारहाण करुन जखमी केले.


यावरुन पोलिस स्टेशन एम आय डी सी भोसरी येथे आईने दिलेल्या तकारारीवरुन गुन्हा दाखल असुन सदर गुन्ह्यात यापुर्वी १) विवेक विनोद नाईक ऊर्फ सोन्या, वय २० वर्षे, रा. सेक्टर १२, खंडेवस्ती, भोसरी, पुणे. २) सौरभ कानिफनाथ भोपले, वय २० वर्षे, रा. सेक्टर १२, खंडेवस्ती, भोसरी, पुणे. यांना सदर गुन्ह्यांत अटक करण्यात आली असुन एका विधीसंघर्षित बालकास तात्काळ ताब्यात घेण्यात आले होते.परंतु सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी १ ) सुरज प्रकाश रणदिवे. वय-३० वर्षे रा. घरकुल,चिखली पुणे.२) अर्थव उदय पकाले, वय २० वर्षे, रा. पी.एम.आ.डी.ए. वसाहत, सेक्टर १२,
एमआयडीसी भोसरी पुणे. हे गुन्हा घडल्यापासुन अद्याप पर्यंत फरारी होते. ते पोलिसांना गुंगारा देऊन वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य करत होते. त्यांचा कसोशीने तपास करुन तांत्रिक विश्लेषनाद्वारे मिळालेल्या माहीतीनुसार त्यांचा शोध घेवुन त्यांना सदर गुन्ह्यात दि. ३१/०७/२०२४ रोजी अटक करण्यात आली
असुन त्यांचे इतर फरारी साथीदार ३) प्रतीक ज्ञानेश्वर सपकाळ. वय २८ वर्षे. रा. वाकड पुणे. ४) चेप्या उर्फ केतन गौतम सोनवणे वय २६ वर्षे रा. मिलींदनगर पिंपरी पुणे. ५) लकी उर्फ लखन उर्फ सुनिल रामभाऊ पवार वय २४ वर्षे रा. काळाखडक झोपडपट्टी, वाकड, पुणे. यांना दि.०१/०८/२०२४ रोजी अटक करण्यात आली असुन सदर गुन्ह्यात एकुन ०८ आरोपी यांना अटक करण्यात आली असुन गुन्ह्यात वापरलेल्या एकुन ०३ मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.

सदरचे आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत. यातील आरोपी सुरज प्रकाश रणदिवे वय-३० वर्षे. रा. घरकुल, चिखली पुणे. हा कुख्यात गुन्हेगार असुन त्याचेवर यापुर्वी पिंपरी चिंचवड आयुक्तालय व पुणे ग्रामिण हद्दीत खालील प्रमाणे गंभीर गुन्हे दाखल आहेत.१) खेड पोलीस स्टेशन पुणे. (ग्रा) गु.र.नं. ३०६ / २०२० भा.दं.वि. कलम ३०२, १२० (ब), १४१, १४३ २) चिंचवड पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ८१/२०२३ भा. दं. वि. कलम ३०२, ३४
३) निगडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं.५३० / २०१८ भा.दं.वि. कलम ३२६,३२४, ३२३, ५०४,३४, आर्म अॅक्ट ४ (२५), २७.

सदरची कारवाई ही पोलिस आयुक्त, विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उपायुक्त परीमंडळ ३ .डॉ.शिवाजी पवार, सहा पोलिस आयुक्त सचिन हिरे. एमआयडीसी भोसरी विभाग, एमआयडीसी भोसरी पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जामदार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोउपनि राजेंद्र पानसरे,पोलिस अंमलदार चंद्रकांत गवारी, शरद गांधिले, राजू जाधव, संजय जरे, स्वप्निल शेलार, गणेश बो-हाडे, राहूल लोखंडे,
जीवन बिराजदार, प्रविण मुळुक, नितिन खेसे, विशाल काळे, भागवत शेप, आनंद जाधव, अक्षय क्षिरसागर, अनिकेत कांबळे यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास एम. आय. डी. सी भोसरी पोलिस स्टेशनचे सहा. पोलिस निरीक्षक किरण पठारे हे करीत आहेत.


