विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांची निर्घुन हत्या

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

पुणे : पुण्यातील सिंहगड रोडच्या रायकर मळा परिसरात एका तरुणाची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ज्याचा खून झाला तो विद्युत
वितरण कंपनीमध्ये कामाला असल्याची माहिती समोर आली आहे.
गोपाळ कैलास मंडवे असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. आज दुपारच्या सुमारास घटनेची माहिती सिंहगड रोड पोलिसांना मिळाली. त्यानंतर तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. गोपाळ मंडवे यांच्या डोक्यात वार करून खून करण्यात आला आहे. ही हत्या नेमकी कोणत्या कारणातून करण्यात आली हे अद्याप समजू शकलेले नाही. सिंहगड रोड पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!