
पोलिस आयुक्तांचे विशेष पथकाची कामगिरी, ९ किलो गांजा जप्त करुन ३ आरोपींना केले जेरबंद….
पोलीस आयुक्तयांचे विशेष पथकाची अंमली पदार्थ गांजाविरोधी मोठी कार्यवाही,तीन आरोपींना ताब्यात घेऊन ९ किलोचे वर गांजा केला जप्त….
अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. (09)ॲागस्ट 2024 रोजी पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशाने आयुक्तालय ह्वदीत अंमली पदार्थाची विक्री करणा-या इसमांची माहीती काढण्याकरीता पेट्रोलींग करीत असतांना विशेष पथकास गुप्त बातमीदाराकडुन खात्रीशीर माहीती प्राप्त झाली की, तिन इसम हे मोपेड गाडी क्र. एम.एच. 27 डी.बी. 0261 पांढ-या रंगाची तसेच सोबत एक आणखी मोपेड गाडीने धर्मकाट्याकडुन निधा हायस्कुल कडे अवैद्यरीत्या अंमली पदार्थ गांजा विक्री करणेकरीता वाहतुक करणार आहे.


अशा खात्रीशीर माहीती प्राप्त झाल्याने नमुद ठिकाणी जावुन, पॅराडाईस कॉलनी, निधा हायस्कुल मैदाना समोर येथे जावुन गाडीचे खाली उतरुन पो. स्टाफच्या मदतीने प्राप्त माहीती प्रमाणे एक मोपेड गाडी क्र. एम.एच. 27 डी.बी. 0261 पांढ-या रंगाची तसेच एक सोनेरी काळ्या रंगाची डी.ओ. मोपेड दिसुन आली. सदर वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये ओलसर हिरव्या कळीचा उग्र वासाचा (झाडपत्ती सारखा दिसणारा) गांजा दिसुन आला. यावरुन त्यांना त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 1) शेख आसीफ शेख युसुफ वय 33 वर्ष रा. रेहमत नगर अम. 2) शेख समीर शेख अतीक वय 28 वर्ष रा. यास्मीन नगर अमरावती 3) मोहम्मद सलीम मोहम्मद कय्युम सौदागर वय 21 वर्ष रा. यास्मीन नगर अम. असे सांगीतले वरुन त्यांना सदर गांजा मालाबाबत विचारपुस केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली वरुन त्यांच्या ताब्यातुन एकुन 9 किलो 995 ग्रॅम गांजा कि.अ. 2,48,750/- रु.चा माल तसेच दोन मोटारसायकल 1,40,000/- रु., दोन मोबाईल कि 20,000/-रु. असा एकुन 04,08,750/- रु. चा माल मिळुन आला सदर गांजा नामक अंमली पदार्थ हा महाराष्ट्र राज्यात बंदी असतांना विक्री करणे करीता वाहतुक करतांना मीळुन आल्याने नमुद आरोपी विरुध्द पोलिस ठाणे गाडगेनगर येथे कलम 20,22,29 एन.डी.पी.एस. अॅक्ट प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास सुरु आहे.

सदरची कार्यवाही पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, पोलिस उपायुक्त(परीमंडळ २) गणेश शिंदे,पोलिस उपायुक्त(मुख्यालय) कल्पना बारवकर,पोलिस उपायुक्त(परीमंडळ १) सागर पाटील, पोलिस निरीक्षक प्रशांत माने पो.स्टे. गाडगे नगर यांच्या मार्गदर्शनात पोलिस आयुक्तांचे विशेष पथकातील प्रभारी स.पो.नि. महेन्द्र इंगळे, सफौ विनय मोहोड,पोहवा सुनिल लासुरकर, सुधिर गुडधे, ना.पो.शि. जहीर शेख, अतुल संभे, पो.शि. राहुल ढेंगेकर, विनोद काटकर, अनिकेत वानखडे यांनी केली आहे.



