
SDPO वर्धा यांचे पथकाने पकडला शहरात चिल्लर विक्रीकरीता येणारा दारुचा माल….
उपविभागिय पोलिस अधिकारी वर्धा यांचे पथकाने नाकाबंदी करून दुचाकी वाहनासह पकडला 1,45,800/- रू चा विदेशी दारूचा माल जप्त…
वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अवैध दारु विक्रेते,पुरवठादार तसेच वाहतुक करणारे यांचे विरुध्द पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी कायदेशीररित्या उघडलेला मोर्चा सर्वश्रुत आहे ते जिल्ह्यात होणार्या सततच्या कार्यवाहीवरुन दिसुन येतेय


त्याअनुषंगाने उपविभागिय पोलिस अधिकारी वर्धा प्रमोद मकेश्वर यांचे आदेशाने त्यांचे अधिनस्त असलेल्या विशेष पथकाने कार्यवाहीचा धडाका मांडलेला दिसतोस त्यानुसार दि(१२) रोजी हे पथक सेवाग्राम पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना गोपनीय माहीती मिळाली की शहरात दारुपुरवठा करणारा कोहीनुर नामक ईसमाचे दोन पंटर 1) रज्जत राजु थुल रा. पुलफैल, वर्धा 2) कोहीनूर उके रा. आयुवेदीक कॉलेज जवळ सांवगी मेघे वर्धा हे पुरवठा करण्यासाठी दारुचा माल घेऊन निघालेले आहे व मसाळा चौक मार्गे सेवाग्राम कडे जाणार आहे अशा मिळालेल्या माहितीच्या आधारे मसाळा चौक, वर्धा येथे नाकेबंदी करून प्रोव्हीशन रेड केला असता त्यांना पोलिस दिसताच त्यांनी त्यांचे ताब्यातील सुजुकी कंपनीची बर्गमॅन व त्यांचेवर ठेवलेला विदेशी व देशी दारूचा माल हा मौक्यावर सोडुन शेतातील जंगली भागातुन पसार झाले. मौक्यावरून एका विना नंबर प्लेटची काळया रंगाची सुजुकी कंपनीची बर्गमॅन दुचाकी मोपेड च्या डिक्की मधुन व समोरील पायदानावरून चार खरडयाचे खोक्यात ऑफीस चाईस, ऑफीसर चाईस ब्लु, रॉयल स्टॅग, आयकॉनिक व्हाईट, टॅगो कंपनीची देशी दारू तसेच एक आरोपीचा सुरू असलेला मोटोरोला कंपनीचा मोबाईल असा एकुन जु.की 145,800/- रू चा माल अवैध्यरित्या विनापास परवाना मिळुन आल्याने जप्तीपंचनामा प्रमाणे जप्त करण्यात आले

त्याअनुषंगाने पोलिस स्टेशन सेवाग्राम येथे पसार आरोपी 1) रज्जत राजु थुल रा. पुलफैल, वर्धा 2) कोहीनूर उके रा. आयुवेदीक कॉलेज जवळ सांवगी मेघे वर्धा यांचे विरूध्द कलम 65 अई, 77 अ 83 म.दा.का सहकलम 3 (1) 181, 130/177, 50 (2) मो.वा.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस स्टेशन सेवाग्राम करीत आहे.

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक नूरुल हसन, अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी वर्धा, रोशन भु. पंडीत यांचे सुचनेप्रमाणे पो.उप.नि. परवेज खॉन, उपविभागीय पोलिस अधिकारी पथकाचे पो.हवा. अमर लाखे, पोलिस कर्मचारी मंगेश चावरे, पवन निलेकर, समीर शेख, यांनी यशस्वी रित्या पार पाडली.


