लातुर गुन्हे शाखेने पकडला १ कोटी चे वर गुटख्याचा साठा…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

स्थानिक गुन्हे शाखेने वाहनासह पकडला 01 कोटी 19 लाख 72 हजार रु किंमतीचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू……

लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक सोमय मुंडे यांनी अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देशित केले आहे. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व अंमलदारांचे पथक तयार करून लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढून त्यावर कारवाई करण्याची मोहीम राबवित आहेत.





अवैध धंद्याची माहिती काढत असताना दि 12/08/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकास खात्रीशीर माहिती मिळाली की, पोलिस ठाणे मुरुड हद्दीमध्ये काही इसमांनी त्यांच्या फायद्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला तंबाखूजन्य गुटख्याची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी साठवून ठेवलेला आहे.अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर माहितीची शहानिशा करून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने दिनांक 12/02/ 2024 रोजी सकाळी मुरुड येथील गुट्टे नगर परिसरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी घरामध्ये दोन ठिकाणी छापा मारला असता तेथे महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेले वेगवेगळ्या कंपनीचे,महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित असलेले गुटखा व सुगंधित पानमसाला असा अनुक्रमे 66 लाख 40 हजार 101 रुपयाचा व दुसऱ्या ठिकाणी 53 लाख 32 हजार 240 असा एकूण 01 कोटी 19 लाख 72 हजार 341 रु चा एकूण  प्रतिबंधित गुटखा व सुगंधित पान मसाला तंबाखू चा मुद्देमाल तसेच वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारा छोटा हत्ती वाहन मिळून आल्याने तो मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.



त्यानुसार सदर ठिकाणी पोलिस ठाणे मुरुड हद्दीत  येथे प्रतिबंधित गुटका व सुगंधित तंबाखूची अवैधरित्या साठवणूक करतांना अनुक्रमे 1) अनिल वसंत कापसे, राहणार गुट्टे नगर, मुरुड.2) विशाल गुट्टे, राहणार मुरुड.3) संदिपान बाबुराव विटेकर, राहणार मुरुड.4) बाळासाहेब ब्रिजलाल लोहिया, राहणार मुरुड. 5) भैरू नरसू गुट्टे, राहणार गुट्टे नगर मुरुड. यांच्यावर अनुक्रमे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस ठाणे मुरुड पोलीस करीत आहेत.



सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक सोमय मुंडे,अपर पोलिस अधिक्षक डॅा अजय देवरे यांचे मार्गदर्शनात,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड, पोलिस अंमलदार विनोद चिलमे, रामहरी भोसले, माधव बिल्लापट्टे, नवनाथ हासबे,मोहन सुरवसे, रियाज सौदागर, तुराब पठाण, राजाभाऊ मस्के, जमीर शेख प्रदीप चोपणे यांनी पार पाडली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!