पुलगाव पोलिसांची मोठी कारवाई: ६.५६ ग्रॅम ब्राऊन शुगरसह दोन आरोपी अटकेत

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

पुलगाव (वर्धा):

गुप्त माहितीच्या आधारे पुलगाव पोलिसांनी शीतला माता मंदिर परिसरात सापळा रचून अमली पदार्थांची खरेदी-विक्री करणाऱ्या दोन आरोपींना रंगेहात पकडले. या कारवाईत पोलिसांनी ₹५७,२००/- किमतीचा ऐवज जप्त केला आहे.



गुन्ह्याचा तपशील

तपशील माहिती
अपराध क्रमांक ६८३/२०२६
कायदेशीर कलमे ८(क), २१(ब), २९ NDPS अ‍ॅक्ट
घटनास्थळ शीतला माता मंदिर परिसर, पुलगाव (ता. देवळी, जि. वर्धा)
घटना वेळ १६ ऑगस्ट २०२६, दुपारी ४:४० ते ५:५० च्या दरम्यान
गुन्हा नोंद वेळ १८ ऑगस्ट २०२६, रात्री ९:१७ वाजता
फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक शहाजी घोडके (वय ३१ वर्षे, पो.स्टे. पुलगाव)
तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मदनकर (वय ४४ वर्षे, पो.स्टे. पुलगाव)

अटक करण्यात आलेले आरोपी

  1. प्रथम धनराज चटपकर (वय २३ वर्षे, रा. इंदिरानगर, पुलगाव, ता. देवळी, जि. वर्धा)

  2. जावेद अहमद मुख्तार अहमद (वय ४३ वर्षे, रा. गुंजखेडा, ता. देवळी, जि. वर्धा)



जप्त करण्यात आलेला मुद्देमाल (एकूण ₹५७,२००/-)

  • ब्राऊन शुगर (हेरॉईन): ६.५६ ग्रॅम (किंमत ₹३७,२००/-)

  •  आरोपी क्र. १: मोरपंखी रंगाचा ओप्पो मोबाईल (किंमत ₹१०,०००/-)



  • आरोपी क्र. २: फिकट गुलाबी रंगाचा ओप्पो मोबाईल (किंमत ₹१५,०००/-)

घटनेची माहिती व पोलिसांची कारवाई

पुलगाव पोलिसांना गुप्त बातमीदाराद्वारे बातमी मिळाली होती की, शीतला माता मंदिर परिसरात अमली पदार्थांची अवैध विक्री सुरू आहे. मिळालेल्या खबरीवरून पोलिसांनी पंचांसमक्ष घटनास्थळी धाड टाकली.



या कारवाईदरम्यान आरोपी १ व आरोपी २ यांच्याकडून ६.५६ ग्रॅम ब्राऊन शुगर आणि दोन ओप्पो मोबाईल हस्तगत करण्यात आले. घटनास्थळी रीतसर जप्ती पंचनामा करून मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन्ही आरोपींविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये (NDPS Act) गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

मार्गदर्शन व पोलीस पथक:

सदर कारवाई पोलीस अधीक्षक  सौरभ अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक  सदाशिव वाघमारे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वंदना कारखेले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक  सदाशिव ढाकणे यांच्या निर्देशानुसार करण्यात आली. या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मदनकर, पोलीस उपनिरीक्षक शहाजी घोडके यांच्यासह पोलीस अंमलदार विनोद रघाटाटे, कुणाल हिवसे, संदीप बोरबन, अजय अनंतवार, सोमेश गंथाडे, संदीप चौरे, अमोल आडे व नकुल शेंडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!