अकोला येथील प्रसिध्द बांधकाम व्यवसाईक यांचेवर खुनी हल्ला करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

प्रसिध्द बिल्डर रामप्रकाश मिश्रा यांचे वर प्राणघातक हल्ला करणारे अज्ञात आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने गुन्हयात वापरलेल्या मोटरसायकल घेतले ताब्यात…..

अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(३०) ॲागस्ट २०२४ रोजी यातील  फिर्यादी व प्रसिध्द बांधकाम व्यवसाईक  रामप्रकाश बन्सलोचन मिश्रा वय ५५ वर्ष रा. माधव नगर, गौरक्षण रोड अकोला. यांनी पोलिस स्टेशन खदान  येथे रिपोर्ट दिला की, ते नागपुर येथून अकोला येथे त्याचे राहते घरी रात्री १०:०० वा सुमारास परत आल्यानंतर ते त्यांचे कार्यालयासमोर वाहनातुन उतरत असतांना अज्ञात दोन ईसमांनी त्यांचेवर मोटार सायकलवर येवून धारदार चाकुने जिवानीशी ठार मारण्याचे उद्देशाने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी करून आरोपी हे घटनास्थळावरून पळून गेल अश्या फिर्यादीचे रिपोर्ट वरून पोलिस स्टेशन खदान येथे अपराध नं ६२८/२४ कलम १०९, ३(५) भा. न्या. सं प्रमाणे गुन्हा नोंद असून त्याचा समांतर तपास सुरु होता





सदर गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने व  गुन्हयातील आरोपी अज्ञात असल्याने पोलिस अधिक्षक बच्चन सिंह यांनी स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांना सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सुचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांनी सपोनि. विजय चव्हाण, पोउपनि गोपाल जाधव यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करून पथकाला गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन करून सुचना दिल्यात.



त्यानुसार तपासात पथकातील अधिकरी आणि अमंलदार यांनी घटनेचे वेळी उपलब्ध असलेले सी.सी.टी.व्ही फुटेज तसेच तांत्रिक बाबींचा व गोपनीय बातमीदार यांचा वापर करून, गुन्ह्याचा तपास करून त्यामध्ये जखमी असलेले फिर्यादी रामप्रकाश मिश्रा यांचे वर हल्ला करणारा ईसम पवन विठ्ठल कुंभलकर वय ३१ वर्ष रा. श्रीकृष्ण भगवान चौक वार्ड क २ कन्हान जि. नागपूर यांने त्याचे साथीदारा सह गुन्हा केल्याचे निष्पन्न करून आरोपी  पवन विठ्ठल कुंभलकर, वय ३१ वर्ष रा. श्रीकृष्ण भगवान चौक वार्ड क्र २ कन्हान जि. नागपूर याचा पाठलाग तसेच सापळा रचुन त्यास ताब्यात घेवून सदर गुन्हयाबाबत विचापूस केली असता त्याने त्याचा सोबत्यासह सदरचा गुन्हा केल्याचे कबुली देवून गुन्हयात वापरलेली एक काळ्‌या रंगाजी बजाज पल्सर गाडी विना नंबर ची ताब्यात घेतली. असुन आरोपीस मुद्देमालासह पोलिस स्टेशन खदान येथे पुढील तपास कामी देण्यात येत असून पुढील तपास सुरू आहे



सदरची कामगिरी ही पोलिस अधिक्षक बच्चन सिंह,अपर पोलिस अधिक्षक अभय डोंगरे,पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांचे मार्गदर्शनात सपोनि. विजय चव्हाण, पोउपनि. गोपाल जाधव, आशिष शिंदे, पो. अमंलदार दशरथ बोरकर, अब्दुल माजीद रविंद्र खंडारे, महेंद्र मलिये, वसीमो‌द्दीन शेख, अविनाश पाचपोर, फिरोज खान, उमेश पराये, खुशाल नेमाडे, गोकूल चव्हाण, सुलतान पठाण, भास्कर धोत्रे, आकश मानकर, धिरज वानखडे, अभिषेक पाठक, मोहम्मंद आमीर, शेख अन्सार, लिलाधर खंडारे, भिमराव दिपके, सतिष पवार, अशोक सोनोने, राहुल गायकवाड, तसेच चालक प्रशांत कमलाकर, अक्षय बोबडे, सायबर पो. स्टे चे आशिष आमले, गोपाल ठोंबरे यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!