
हल्दीराम कंपनीच्या दुधाच्या रिकाम्या कंटेनर मधुन गुटख्याची तस्करीचा भंडारा पोलिसांनी केला पर्दाफाश…
पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे आदेशाने प्रतिबंधीत सुगंधित तंबाखुची वाहतुक करणाऱ्या दोन वाहनावर दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई, एकुण रू.१२०,५४८०/- रु चा मुद्देमाल जप्त व दोन आरोपी ताब्यात….
भंडारा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी भंडारा जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरु राहणार नाही. त्याकरीता नागरीकांनी सहकार्य करुन अवैध धंदयाची माहीती कळविल्यास त्यावर तातडीने कार्यवाही करण्यात येईल याबाबत भंडारा जिल्हयातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात आले असुन त्यांना त्यांच्या तकारी देण्याकरीता प्रसारीत केलेल्या मोबाईल क्रमांकावर माहीती देण्यात व माहीती देणार्याचे नाव गुप्त ठेवणार असल्याचे सांगीतले होते.


त्या अनुषंगाने दि.१७ जानेवारी रोजी पोलिस अधिक्षक यांना फोनद्वारे गोपनीय मिळाली की, राजनांदगाव येथुन एका दुधाच्या कटेनर वाहनामध्ये प्रतिबंधीत सुगंधीत तबांखु घेवून लाखनी येथे येणार आहे अशा गोपनीय माहीतीवरून पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी त्याचे अधिनस्त असलेल्या दहशतवाद विरोधी शाखा भंडारा येथील पथकास सदर ठिकणी जावुन कार्यवाही करण्याबाबत आदेशीत केले होते.

त्यानुसार दिनांक १७ रोजी२०२५ रोजी दुपारी १.०० वा सुमारास दहशतवाद विरोधी शाखेचे अधिकारी सपोनि गोरखनाथनागलोत, पो. हवा गभणे, वैद्य,तांडेकर, पोशि दमाहे, भुते, असे मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी गोपनीयरित्या जावुन पाहणी केली असता लाखनी पो. स्टे हद्दीत राजेगांव एमआयडीसी, खुटसावरी जवळ सिध्दी इंडस्ट्रियल गॅस प्रोडक्टस् प्रा.लि कंपनी समोरील डांबरी रोडवर उभे असलेले हल्दीराम कंपनीचा दुधाचा ४०७ टाटा टेम्पो वाहन क्र. एम.एच ४० ए के ५६४० या वाहनातुन सफेद रंगाची मारूती ओमनी व्हॅन एम.एच ४० वी ई ०६६८ या वाहनामध्ये प्रतिबंधित सुगंधी तंबाखुच्या चुंगळ्या लोड करीत असताना सापळा लावुन पकडण्यात आलेले आहे.

सदर चुंगळ्याची दोन पंचासमक्ष तपासणी केली असता त्यामध्ये १) रू. ०१,६४,०००/- किंमतीचा होला हुक्का शिशा तंबाखुचे एक किलो वजनाचे एकुण २०० पाऊच. प्रति पाऊचची किंमत रू. ८२०/- ०२) इगल झेन तंबाखुचे एकुण १३२ पाऊच, प्रत्येकी किंमत रू. ६४०/- व ४०० गॅम वजनाचे. ०३) मजा १०८ कंपनीचे सुंगचित तंबाखुचे २० बॉक्स प्रत्येक बॉक्समध्ये एकुण १० डब्बे. प्रत्येक डब्याचे वनज ५० ग्रॅम व किंमत रू. २३५/- असे एकुण २०० डब्बे असा एकुण रू. ०२,९५, ४८०/- किमतीचा प्रतिबंधीत सुगधित तंबाखु व १) रु ७,००,००० की टाटा कंपनीचा हल्दीराम कंपनीचा दुधाचा ४०७ टेम्पो वाहन क एम.एच ४० ए के ५६४० २) रू २,००,००० की. मारूती ओमनी कंपनीची व्हॅन एम.एच ४० वी ई ०६६८ ३) रु १०,००० की. आरोपीचे ताब्यातील २ मोबाईल फोन असा एकुन रू १२०,५४८० चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच हल्दीराम कंपनीचा दुधाचा ४०७ टेम्पो वाहन क्र एम.एच ४० ए के ५६४० च्या चालक प्रशांत कृष्णराव खडसे वय ४० वर्षे, धंदा वाहन चालक, रा. रेखा गुरबुडे यांचे घरी किरायाने, हनुमान नगर, भान्डे वाडी, नागपुर शहर व सफेद रंगाची मारूती ओमनी व्हॅन एम. एच ४० वी ई ०६६८ च्या बालक नामे मुन्नेश्वर जानवा हारीकर वय ४२ वर्षे, धंदा वाहन चालक, रा सोनेगांव, ता. पवनी, जि.भंडारा यांना ताब्यात घेतले असुन सदर गुटख्याचा मालक अस्पाक पठान रा. अड्याळ हा त्याचे दुचाकीने घटनास्थळावरून पळून गेला असुन वरिल तिन्ही आरोपीवर विरुध्द पो. स्टे लाखनी येथे गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास लाखनी पोलिस करत आहेत
सदरची कार्यवाही हि पोलिस अधिक्षक नूरुल हसन,अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनाखाली दहशदवाद विरोधी शाखेचे सपोनि गोरखनाथ नागलोत, पो.हवा गभणे, वैद्य, तांडेकर, पोशि दमाहे, भुते, यांनी केली


