
पोलिस आयुक्त डॅा रवींद्र कुमार सिंगल, विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित….
नागपूरचे पोलिस आयुक्त डॅा रविंद्र कुमार सिंगल,कोल्हापुर परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी,पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे,कमांडंट रामचंद्र केंदे यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर, महाराष्ट्र पोलिस दलाला एकूण ४३ पदके…
पुणे( सायली भोंडे)प्रतिनिधी – प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला अप्पर पोलिस महासंचालक डॉ. रवींद्रकुमार सिंगल,पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, सुनील फुलारी, कमांडंट रामचंद्र केंदे यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.तसेच पोलिस महानिरीक्षक संजय दराडे, आरती सिंह यांच्यासह महाराष्ट्रातील ३९ पोलीसांना गुणवर्तापूर्ण सेवेसाठी पदक जाहीर करण्यात आले आहे.


देशात पोलीस, अग्निशमन सेवा, गृहरक्षक आणि नागरी संरक्षण आणि सुधार सेवेतील एकूण ९४२ कर्मचाऱ्यांना शौर्य/सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये पोलिस दलासाठी एकूण ७९७ पदकांचा समावेश आहे. महाराष्ट्र पोलिस दलाला एकूण ४३ पदके मिळाली आहे. राज्य पोलिस दलातील अप्पर पोलिस महासंचालक दर्जाचे नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल, महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, महानिरीक्षक सुनील फुलारी आणि कमांडंट रामचंद्र बाबू केंडे यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.

गुणवर्तापूर्ण सेवेसाठी पदक जाहीर झालेल्या राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांची यादी पुढील प्रमाणे –

१. संजय भास्कर दराडे, पोलिस महानिरीक्षक
२. वीरेंद्र मिश्रा, पोलिस महानिरीक्षक
३. आरती प्रकाश सिंह, पोलिस महानिरीक्षक
४. चंद्र किशोर रामजीलाल मिना, पोलिस महानिरीक्षक
५. दीपक कृष्णाजी साकोरे, पोलिस उपमहानिरीक्षक
६. राजेश रामचंद्र बनसोडे, पोलिस अधिक्षक
७. सुनील जयसिंग तांबे, पोलिस उपअधीक्षक
८. ममता लॉरेन्स डिसूझा, सहाय्यक पोलिस आयुक्त
९.धर्मपाल मोहन बनसोडे, सहाय्यक पोलिस आयुक्त
१०. मधुकर माणिकराव सावंत,पोलिस निरीक्षक
११. राजेंद्र कारभारी कोते,पोलिस निरीक्षक
१२. रोशन रघनाथ यादव. पोलिस उपअधीक्षक
१३. अनिल लक्ष्मण लाड, पोलिस उपअधीक्षक
१४. अरुण केरभाऊ डुंबरे, सहाय्यक पोलिस आयुक्त
१५. नजीर नासीर शेख,पोलिस उपनिरीक्षक
१६. श्रीकांत चंद्रकांत तावडे,पोलिस उपनिरीक्षक
१७. महादेव गोविंद काळे,पोलिस उपनिरीक्षक
१८. तुकाराम शिवाजी निंबाळकर,पोलिस उपनिरीक्षक
१९. आनंदराव पुंजाराव मस्के, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक
२०. रवींद्र बाबुराव वानखेडे,पोलिस उपनिरीक्षक
२१. सुरेश चिंतामण मनोरे,पोलिस निरीक्षक
२२. राजेंद्र देवमान वाघ, पोलिस उपनिरीक्षक
२३. संजय अंबादासराव जोशी, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक
२४. दत्तू एकनाथ गायकवाड, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक
२५. नंदकिशोर ओंकार बोरोले, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक
२६. आनंद रामचंद्र जंगम, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक
२७. सुनीता विजय पवार, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक
२८. जितेंद्र विठ्ठल म्हात्रे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक
२९. प्रफुल्ल रामचंद्र सुर्वे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक
३०. राजेंद्र शंकर काळे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक
३१. सलीम गनी शेख, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक
३२. तुकाराम रावसाहेब आव्हाळे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक
३३. रामभाऊ संभाजी खंडागळे, पोलिस हवालदार
३४. संजय भास्करराव चोबे, पोलिस हवालदार
३५. सय्यद इक्बाल हुसेन सय्यद माथार हुसेन, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक
३६.रामराव वामनराव नागे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक
३७ विजय दामोदर जाधव, पोलिस हवालदार
३८. दिलीप भोजुसिंग राठोड, पोलिस हवालदार
३९.आयुबखान अकबर मुल्ला,पोलिस हवालदार


