नोकरीच्या नावाखाली आर्थिक फसवनुक करणार्यास सायबर पोलिसांनी उत्तर प्रदेशातुन घेतले ताब्यात….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

नोकरी लावुन देण्याचे आमिष दाखवुन फसवणुक करणारे आरोपी सायबर पोलीसांच्या जाळयात,उत्तर प्रदेश येथुन घेतले ताब्यात…

वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि 14 फेब्रुवारी रोजी फिर्यादी सुरज धनराज जोध रा. आष्टी यांनी त्यांचे मोबाईलवर Naukri.com येथे महिंद्रा अॅन्ड महिंद्रा कंपनीमध्ये जी.टी. इंजीनिअर या पदाच्या जागा रिक्त असल्याची जाहिरात पाहिली व नोकरीकरीता अप्लाय केला त्यासंबंधाने फिर्यादी यांना कॉल आला व आपल्याला मुलाखातीकरीता मेल प्राप्त होईल त्याकरीता फिर्यादी यांना वेगवेगळ्या कारणास्तव एकुण 1,38.450/-रु भरायला सांगुन नोकरी संबंधाने फसवणुक केली. अशा फिर्यादीचे तक्रारीवरुन दि 12  रोजी सायबर पोलिस स्टेशन येथे अप क्र. 40/2024 कलम 318 (4), 319 (2) सहकलम 66 (ड) माहिती तंत्रज्ञान कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता





सदर गुन्हयाचा संपुर्ण तपास हा  तांत्रीक पद्धतीने केला असता अनेक तांत्रीक बाबींचे विष्लेशन करुन सदरचे आरोपी हे बिहार राज्यातील असुन सध्या वाराणसी, उत्तर प्रदेश येथे वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले त्यानुसार पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांचे आदेशान्वये सायबर पो.स्टे मार्फत एक पथक तयार करुन दि 03  रोजी सदरचे पथक हे वाराणासी, उत्तर प्रदेश व पटना, बिहार येथे रवाना झाले.



सदर पथकाने सतत 4 दिवस आरोपींची तांत्रीक व गोपनीय पद्धतीने माहिती काढुन आरोपींना निष्पन्न करुन सदरचे आरोपी हे 5 खोल्यांचे घर किरायाने घेऊन तेथुन संपुर्ण भारतभर फसवणुकिचे गुन्हे करत होते. सदर घरावर छापा टाकला असता आरोपी  1)कुमार मदनमुरारी सिंह वय 33 वर्ष रा. कुरथॉल, पटना, बिहार 2) रोशनकुमार अखिलेशकुमार सिंह वय 30 वर्ष रा. पटेल नगर, पटना, बिहार दोन्ही सध्या शांतीनगर कॉलोनी वारानसी, उत्तर प्रदेश येथे राहुन लोकांची फसवणुक करत असताना रंगेहात मिळुन आले. सदर दोन्ही आरोपींना ताब्यात घेवुन त्यांच्या ताब्यातुन 1 नोटपॅड, 8 मोबाईल, 3 लॅपटॉप, 3 एटीएम कार्ड व नगदी 1,19,000/-रु असा एकुण 2,42,000/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन सदर फसवनुकीचा गुन्हा उघडकिस आणला. आरोपींकडुन महाराष्ट्रासह इतर राज्यातील गुन्हे उघड झाले असुन आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.



सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधिक्षक डॉ. सागर रतनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात व निर्देशाप्रमाणे पो.उप.नि. प्रकाश लसुंते, पोलिस हवा निलेश तेलरांधे, दिनेश बोथकर, वैभव कट्टोजवार, अमित शुक्ला, अनुप कावळे, रंजीत जाधव, अनुप राऊत, प्रतिक वांदीले, पवन झाडे, मपोशि लेखा राठोड, आरती पारीसे सर्व सायबर पोलीस स्टेशन वर्धा यांनी केली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!