वर्धा शहरातुन मोटारसायकल चोरी करणारी टोळी डि बी पथकाने केली गजाआड,दहा गुन्हे केले उघड…..

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

वर्धा शहरातुन दुचाकी चोरी करुन नजीकच्या जिल्हयात विकणारी टोळी वर्धा शहर डीबी पथकाने केली गजाआड, मोटर सायकल चोरीचे दहा गुन्हे केले उघड….

वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,गेल्या काही दिवसात वर्धा शहरातुन  मोटरसायकल चोरीचे वाढते प्रमाण लक्षात घेता पोलिस अधिक्षक तसेच उपविभागिय पोलिस अधिकारी वर्धा यांनी पोलिस स्टेशन वर्धा शहर चे ठाणेदार पोलिस निरीक्षक पराग पोटे यांना सदरच्या दुचाकी चोरी सॅदर्भात विशेष लक्ष देऊन सदरचे गुन्हे उघडकिस आणण्यासाठी आदेशीत केले होते





त्याअनुषंगाने ठाणेदार पोलिस निरीक्षक पराग पोटे यांनी त्यांचे अधिनस्त असलेल्या डिबी पथकास सुचना दिल्या त्यानुसार दिलेल्या सुचनाप्रमाणे व त्यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिस उपनिरीक्षक शरद गायकवाड पोलिस हवालदार प्रशांत वंजारी,नापोशि नरेंद्र कांबळे,पोशि वैभव जाधव, श्रावण पवार  यांनी रामनवमी चे दिवशी चोरी गेलेल्या मोटरसायकल संबंधाने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तर त्यांना सदर चोरटे हे रेकॅार्डवरील गुन्हेगार मसाळा हद्दीतील असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यावरुन त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरी केलेल्या मोटरसायकल या अमरावती जिल्हा येथे एका गावात ठेवल्याचे समजले,



त्यानुसार मिळालेल्या माहितीवरून पोलिस स्टेशन वर्धा शहर येथील डीबी पथकाने काशीखेड तहसील धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती येथे जाऊन अक्षय उर्फ गौरव पद्माकर काळे व 26 वर्ष राहणार काशीखेड याला ताब्यात घेऊन त्याला विचारपूस केली असता त्याने तीन मोटरसायकल वर्धा बाजारातून रामनवमीच्या दिवशी त्याचा आते भाऊ शुभम फुलझेले याच्यासह चोरी केल्याचे सांगितले तसेच त्यापैकी एक मोटर सायकल आरोपी अमोल कैकाडी याच्या हाताने नेर जिल्हा यवतमाळ येथे विकण्याकरता पाठवल्याचे सांगितले त्यावरून तेथे चोरी गेलेली मोटरसायकल व आरोपी अमोल कैकाडी याला ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली असता सदरच्या मोटरसायकल हि अक्षय काळे व त्याचा आते भाऊ शुभम फुलझले यांनी चोरी करून मला विकण्याकरता दिल्याचे सांगितले त्यावरून अमोल कैकाडी व अक्षय काळे यांच्यासह वर्धेला येऊन साईनगर मसाळा येथून शैलेश मधुकरराव फुलझले व शुभम मारोतराव हातेकर याला ताब्यात घेऊन वरील चारही आरोपी यांना अटक केली



तसेच सदर गुन्ह्यात मा. न्यायालयातून पीसीआर प्राप्त करून त्यांना विचारपूस केली असता आरोपी क्रमांक 1) शैलेश मधुकरराव फुलझले वय 26 वर्ष राहणार साईनगर मसाळा यांनी त्याचा मामेभाऊ आरोपी क्रमांक 2) अक्षय उर्फ गौरव पद्माकर काळे व 28 वर्ष रा. काशीखेड तहसील धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती यांच्या मदतीने दिनांक 6/4/ 2025 रोजी वर्धा मार्केट परिसरातून 1) एक पॅशन प्रो लाल रंगाची क्रमांक एम एच 32 यु 6७९८ कि. 20,000 रुपये 2) एक काळ्या रंगाची फॅशन प्रो क्रमांक एम एच 32 टी 6899 कि. 11,000 रुपये 3) एक पांढऱ्या निळ्या रंगाची फॅशन प्रो एम एच 31 डी एल 7923 कि. 50,000/ रुपये या चोरी केल्याचे समजले तसेच आरोपी शैलेश फुलझेले यांनी एक लाल रंगाची एक्टिवा क्रमांक एम एच 32 झेड एम एस 32 झेड 5532 कि. 10,000/- रु धामणगाव रेल्वे जीआरपीएफ पोलीस स्टेशन हद्दीतून तसेच एक काळा रंगाची फॅशन एम एच 32 व्ही 9207 कि 30,000/- रु हि सन 2024 चे आंबेडकर जयंतीच्या दिवशी चोरी केल्याचे त्याचप्रमाणे एक बजाज डिस्कवर एम एच ३२ S. 7925 कि, 30,000/- रु ही  रेल्वे स्टेशन वर्धा चे समोरून चोरी केल्याचे सांगितले.

त्याप्रमाणे आरोपी शुभम महादेवराव हातेकर रा साईनगर मसाळा यांनी सरकारी दवाखाना  वर्धा येथून एक स्प्लेंडर एम एच 32 ए क्यू 3041 कि, 30,000/रु हनुमान नगर वर्धा येथून एक होंडा शाईन मोटरसायकल क्रमांक एम एच 32 ए ए 2036 किंमत 15000/रु तसेच नागपूर येथून वेगवेगळ्या परिसरातून एक होंडा शाईन एम एच 40 बी व्ही 35 12 व एक होंडा पॅशन एम एच 31 डी 69 42 किंमत 55000 / रुपये चोरी केल्याचे सांगितले वरील सर्व 9 मोटरसायकलवर व 1 मोपेड गाडी या वरील आरोपींपासून काशीगड जिल्हा अमरावती ग्रामीण तसेच साईनगर मसाला परिसरातून एकूण किंमत 2,91,000/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदरची विशेष कामगिरी ही पोलिस अधीक्षक अनुराग जैन,अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे,उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार पोलिस स्टेशन वर्धा शहर पोलिस निरीक्षक पराग पोटे यांचे मार्गदर्शनात डि बी पथकाचे पो उपनि शरद गायकवाड, पो हवा प्रशांत वंजारी, नापोशि नरेंद्र कांबळे, पो शि वैभव जाधव, श्रावण पवार सर्व पोलिस स्टेशन वर्धा शहर यांनी केली





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!