
भंगार व्यापाऱ्यावर दरोडा टाकणारे आरोपी मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…
सहा आरोपींना ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने उघड केला दरोड्याचा गुन्हा,आरोपींकडुन 50,000/- रु मुद्देमाल केला हस्तगत…
नंदुरबार(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.23 एप्रिल 2025 रोजी ठाणे येथील भंगार व्यापारी औरंगजेब सय्यद शेखावत सय्यद, रा. ग्रीन व्ह्यु अपार्टमेंट, ठाणे, महाराष्ट्र यांना जामदा येथील लाल ऊर्फ सजिन निला भोसले व त्याचे साथीदार यांनी स्वस्तात भंगार देण्याचे बहाण्याने नंदुरबार येथे बोलावुन फिर्यादी औरंगजेब सय्यद शेखावत सय्यद व त्यांचे सोबती अशांना मोटारसायकलीवर एका जंगलात घेऊन जाऊन तेथे फिर्यादी व त्यांचे सोबती अशांकडील रोख रक्कम, मोबाईल, ऑनलाईन पेमेंट हे जबरीने घेऊन त्यांना जबर मारहाण केली यावरुन फिर्यादी औरंगजेब यांचे तक्रारीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाणे येथे गु.र.नं. 262/2025 भा. न्या. संहिता कलम 310(2), 311. 351(2) (3) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.


गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधिक्षक श्रवन दत्त यांनी सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेमार्फत करा असे आदेशीत केले होते यावरुन सदर गुन्ह्याचा समांतर तपास सुरु असतांना काही आरोपींना निष्पन्न केले तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त माहिती मिळाली की, सदर गुन्हयातील निष्पन्न आरोपी हे जामदा गावातील एका चौकात बसले आहेत, बाबत खात्रिशीर माहिती मिळालेवरुन पोलिस अधिक्षक. श्रवण दत्त. एस यांचे मार्गदर्शनाखली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी लागलीच स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास रवाना केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने जामदा, ता. साक्री जि. धुळे येथे जाऊन मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने शोध घेतला असता तेथे गुन्हयातील आरोपी हे मिळुन आले.

त्यांना त्याचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांची नावे अनुक्रमे ।). लाल ऊर्फ सजिन निला भोसले, वय- 32 वर्षे 2)कनेश निला भोसले, वय- 40 वर्षे 3) भुऱ्या निला भोसले, वय 30 वर्षे 4) जैन जयदेव पवार, वय 35 वर्षे सर्व राहणार जामदा, ता. साक्री जि धुळे यांनी ताब्यात घेण्यात आले. तसेच त्यांचेकडुन एकुण 50,000/- रु रोख रक्कम व मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सदर गुन्हयातील उर्वरीत आरोपी क्र 5) हरेष शामराव भोसले, वय- 35 वर्षे 6) सोनेश विनायक चव्हाण, वय- 27 वर्षे, दोन्ही राहणार जामदा, ता. साक्री जि. धुळे यांना देखील ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले असुन सर्व आरोपींना नंदुरबार शहर पोलिस ठाण्याचे स्वाधीन करण्यात आले आहे.

सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक श्रवण दत्त. एस. अपर पोलिस अधिक्षक अशित कांबळे, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, परि. पोउपनि सुनिल भामरे, पोहवा राकेश वसावे, बापु बागुल, विशाल नागरे, पोशि अभय राजपुत, दिपक न्हावी, आनंदा मराठे, सतिश घुले यांनी केली आहे.


