MD पदार्थासह दोंघांना हिंगणघाट डी बी पथकाने घेतले ताब्यात….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

चिल्लर विक्रीकरीता अंमली पदार्थ MD ची वाहतुक करतांना दोघे हिंगणघाट डी बी पथकाचे ताब्यात….

हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,हिंगणघाट शहरातील तरुन पिढी ही नशेच्या आहारी जाऊ नये म्हनुन पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी  तरुण पिढीस गांजा MD वा तत्सम अशा वस्तुंचा पुरवठा करणारे विरुध्द कडक कार्यवाही करण्याचे सक्त आदेश देण्यात आले होते त्याअनुषंगाने पोलिस निरीक्षक देवेंद्र ठाकुर ठाणेदार पोलिस स्टेशन हिंगणघाट यांनी त्यांचे अधिनस्त असलेल्या डि बी पथकास तशा सुचना देण्यात आल्या होत्या





त्यानुसार  सपोनि अनिल आळंदे हे पोलिस स्टेशनला हजर असताना व गुन्हे प्रगटीकरन पथकाचे अंमलदार हे पोस्टे परिसरात रात्र गस्त पेट्रोलिंग करीत असतांना मुखबिर कडुन खात्रीशीर खबर मिळाली की,‘निखिल अशोकराव भोकरे वय 20 वर्ष रा. संत चोखोबा वार्ड, हिंगणघाट हा त्याच्या ताब्यातील मोटरसायकल नि त्याचेजवळ MD नावाचा अंमली पदार्थ विक्री करण्याचे उद्देषाने जवळ बाळगुण जाम कडून हिंगणघाट कडे येत आहे,अशा खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदरची माहीती पोलिस निरीक्षक देवेंद्र ठाकूरयांना देवून त्याचे आदेशाने हिंगणघाट परिसरात मौजा रिमडोह येथे पोस्टाँप सह रवाना होवून नॅशनल हायवे क्रमांक 44 येथील हनुमान मंदीरा जवळ नाकेबंदी लावली



खबरेप्रमाणे एका मोटरसायकल वर हिरव्या रंगाचा शर्ट घालून असलेला जाम कडून सर्विस रोडने येताना दिसून आल्याने सदर मोटरसायकल चालक यास  सापळा रचून ताब्यात घेउन मोटर सायकल चालक यास विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव, पत्ता, निखिल अशोकराव भोकरे वय 20 वर्ष व त्याच्या मागे बसलेल्या इसमाने आकाश उर्फ लल्ला धनराज शिंदे वय 34 वर्ष दोन्ही रा. संत चोखोबा वार्ड, हिंगणघाट .जि. वर्धा असे सांगीतले. पंचासमक्ष त्यांची कायदेशीर रित्या अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीमध्ये मोटर सायकल चालक निखिल अशोकराव भोकरे याच्या पॅन्टच्या खिशात 1)एका प्लॅस्टीकच्या पन्नी मध्ये MD नावाचा अंमली पदार्थ भरून त्याचे एकुण प्लास्टिक पन्नीसह वजन 6.55 ग्रॅम किंमत 18, 390/-  रु 2) हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस विना क्रमांकाची किंमत 90,000/-  रू. असा एकुण  1,08,390/- रू किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने पंचासमक्ष जप्ती पंचनामा कार्यवाही करून अमली पदार्थ जप्त करून एनडीपीएस कायदयान्वये दोन्ही आरोपींविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला.



सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक अनुराग जैन, अप्पर पोलिस अधिक्षक डाँ. सागर रतनकुमार कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी हिंगणघाट रोशन पंडीत यांचे निर्दशानुसार पोलिस निरीक्षक देवेंद्र ठाकूर ठाणेदार पोलिस स्टेशन. हिंगणघाट यांचे आदेशाने पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील सपोनी अनिल आळंदे यांचे  मार्गदर्शनात डि.बी. पथकाचे पोलिस हवालदार प्रशांत ठोंबरे, नापोशि राहुल साठे, पोशी आशिष नेवारे,पो.शि. मंगेश वाघमारे सायबर शाखा वर्धा येथील पो. हवा अनुप कावळे,नापोशि गोविंद मुंडे यांनी केली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!