अकोल्यात ‘शिकलकरी गँग’चा पर्दाफाश; आंतरराज्यीय घरफोडी टोळी गजाआड, २० गुन्हे उघडकीस!

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अकोला (१३ ऑगस्ट २०२६):

अकोला शहरातील बंद घरे आणि सोसायट्यांमध्ये घरफोडी करून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरवणाऱ्या आंतरराज्जीय ‘शिकलकरी गँग’ मधील सराईत चोरांच्या मुसक्या आवळण्यात अकोला स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) यश आले आहे. या कारवाईमुळे अकोला शहरातील २० घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.



अकोला शहरातील खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत बंद घरे, फ्लॅट्स आणि निवासी सोसायट्यांचे कडी-कोंडे तोडून सोन्या-चांदीचे मौल्यवान दागिने, रोख रक्कम व कॅमेरे चोरीला जाण्याच्या घटना सातत्याने घडत होत्या. याप्रकरणी खदान पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते.

घटनेचे गांभीर्य ओळखून अकोला पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हकर यांना तातडीने आरोपींचा शोध घेण्याचे निर्देश दिले होते.



अशी झाली कारवाई आणि चौकशी:

  • तांत्रिक तपासाचा आधार: सपोनि निलेश देशमुख आणि त्यांच्या पथकाने अत्यंत कौशल्याने तांत्रिक व गोपनीय माहिती गोळा केली.

  • पहिल्या आरोपीला अटक: मिळालेल्या माहितीवरून मुख्य आरोपी गोविंदसिंग उर्फ गोलू बलबीर सिंग (वय ३३ वर्ष, रा. देवी खदान, अकोला) याला अकोला येथून सापळा रचून शिताफीने ताब्यात घेण्यात आले.



  • चोरीची कबुली व ‘रेकी’ पद्धत: पोलिसी हिसका दाखवताच गोविंदसिंगने कबुली दिली की, तो खडकी परिसरातील बाहेरगावी गेलेल्या नागरिकांच्या बंद घरांवर लक्ष ठेवून ‘रेकी’ करायचा.

  • मध्य प्रदेश कनेक्शन: रेकी केल्यानंतर त्याने मध्य प्रदेशातील आपला साथीदार देवेंद्रसिंग प्रेमसिंग टाक (वय २९ वर्ष, रा. इनपुन पुनर्वसन, ता. पुनासा, जि. खंडवा, म.प्र.) याला बोलावून घेतले.



दोघांनी मिळून खदान परिसरात १० ठिकाणी घरफोडी करून मुद्देमाल चोरला, तर इतर १० ठिकाणी घरे फोडली, परंतु तिथे त्यांच्या हाती काही लागले नाही.

दुसऱ्या आरोपीला मध्य प्रदेशातून अटक

आरोपी गोविंदसिंगने दिलेल्या माहितीवरून आणि तांत्रिक विश्लेषणावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने थेट मध्य प्रदेशातील खंडवा जिल्हा गाठून आरोपी देवेंद्रसिंग प्रेमसिंग टाक याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले.

दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी खदान पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

तपास पथक व अधिकारी

ही धडक कारवाई अकोला पोलीस अधीक्षक अचित चांडकअपर पोलीस अधीक्षक  बी. सी. राजा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

  • नेतृत्व: पो.नि. नितीन लेव्हकर, सपोनि निलेश देशमुख, पोउपनिरिक्षक विष्णु बोडखे.

  • पथकातील अंमलदार: शेख हसन, उमेश पराये, खुशाल नेमाडे, अब्दुल माजिद, फिरोजखान, एजाज अहमद, आकाश मानकर, मोहम्मद आमीर, अभिषेक पाठक, अमोल दिपके, श्रीकांत पातोंड, धीरज वानखडे, राज चंदेल, चालक देवानंद खरात आणि प्रकाश लोखंडे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!