खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी नागपूर शहर पोलिसांच्या ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी नागपूर शहर पोलिसांच्या ताब्यात…

नागपूर (शहर प्रतिनिधी) – खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला सदर पोलिसांनी रात्रंदिवस एक करून सुद्धा तो पोलिसांना मिळत नव्हता, तो ठावठिकाणा बदलुन गुंगारा देत होता. खुन केल्यापासुन तो फरार होता. त्याचा शोध दरम्यान तो पोलीसांची दिशाभुल करण्याकरीता वेगवेगळे मोबाईल नंबर तसेच दुस-यांचे मोबाईल फोनचा वापर करीत असल्याने अन् तसेच तो वेळोवेळी स्वतःची जागा बदलून लोकेशन बदलवीत असल्याने मिळुन येत नव्हता. शेवटी प्राप्त माहितीचे आधारे त्याचा शोध घेण्याकरीता सदर पोलीसांनी अथक परिश्रम करून वेगवेगळया टिम तयार करून दिवसरात्र एक करून तपास चक्र फिरवून रायपुर, मैहर, सतना, वाराणसी, दिल्ली, हरियाणा या ठिकाणी वारंवार शोध घेऊन पण, तो मिळुन येत नव्हता. शेवटी आपले बुध्दीकौशल्य तांत्रीक विश्लेषण मिळालेली गोपनीय माहित या वर त्याच्या ठिकाणाचा पत्ता शोधून लुधीयाना मध्ये त्याला पकडण्यात यश मिळाले.





या बाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नमूद गुन्हयातील मृतक नामे- विनय सॅम्युअल पुणेकर (वय ५२ वर्ष), रा.प्लॉट नंबर ११, सुराना ले-आऊट, राजनगर, पोलीस ठाणे सदर नागपूर शहर यांचा फोटोग्राफीक वाईल्ड लाईफ फोटोचा तसेच मॉडलिंगचा व्यवसाय होता त्यांची पत्नी त्यांचे सोबत राहत नसल्याने ते दोघे वेगवेगळे राहावयास होते. त्यामुळे त्यांचा मुलगा (प्रेस) विनय पुणेकर (वय २५ वर्ष) हा त्यांचे वडिलांना भेटण्याकरीता घरी येत जात होता. (दि.२४ फेब्रुवारी२०२४) रोजी १२:३० वा.ते १३:०० वा.सु. विनय पुनेकर यांचे घरा शेजारी कपडे प्रेस करणारा दुकान मालक राजेश कनोजीया यांनी प्रेस पुणेकर यास फोनद्वारे तुम्हारे पिता पितानी उनके घर के अंदर हॉल मे दरवाने के पास नमीनपर बेहोशी हालत में पड़े है। और सरसे खुन निकल रहा है अशी माहीती दिली. त्यावरून प्रेस पुणेकर हा त्यांचे वडिलांकडे गेला असता, त्याचे वडिलांच्या घराचा दरवाजा अर्धवट उघडा दिसून आला आणि वडिल पाठीच्या भारावर खाली पडलेल्या अवस्थेत, डोक्यातुन रक्त निघत असतांना व गळयाच्या कंठावर छिद्राचे निशान असलेल्या परिस्थीतीत दिसून आले. त्यांचे जवळच अग्नीशस्त्राच्या काडतुसचे रिकामी केस दिसून आले. त्यावरून प्रेस पुणेकर यांने लागलीच पोलीसांना घटनेची माहीती दिली. त्यावरून सदर पोलीस घटनास्थळी पोहचले असता, कोणीतरी अज्ञात व्यक्तीने विनय पुणेकर यांना गोळी झाडून त्यांची हत्या केल्याचे क्राईम सिन वरून दृष्टीस पडले त्यावरून सदर पोलीस ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष ठाकरे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना घटनेची माहिती दिली त्यांच्या मार्गदर्शना नुसार अज्ञात खुन करणा-या गुन्हेगाराचा छळा लागण्याकरीता पोलीसांचे वेगवेगळे पथके तयार करून तपासाची चक्रे फिरवली. त्या दरम्यान मृतकाचे मोबाईल फोन चाळल्या नंतर सदर पोलीसांनी घटनास्थळाचे, परिसरातील आजुबाजुचे तसेच नागपूर शहरातील सिओसी चे कॅमेरे पिंजुन काढल्यानंतर एक महिला व इसम या दोघांच्या संशयीत हालचाली पोलीसांना आढळुन आल्या. त्याप्रमाणे सदर पोलीसांनी साक्षी मोहित ग्रोवर (वय ३६ वर्ष) रा.मारबेला अपार्टमेन्ट दुसरा माळा, पोलीस ठाणे मानकापुर नागपूर शहर हिचा शोध घेवुन तिला ताब्यात घेतले तिच्या कडे सखोल तपास करून विचारपुस केली असता तिने तिचा परिचीत इसम हेमंत रामनरेश शुक्ला रा.मध्यप्रदेश राज्य याने त्याचे जवळील अग्नीशस्त्राचा वापर करून विनय पुणेकर यांचा खुन केला आहे. त्याकरीता त्याने तिचे सोबत कटकारस्थान रचला होता. त्याप्रमाणे तिने त्याला पुर्ण मदत केली होती असे तपासात सांगितले. त्यावरून विनय पुणेकर यांचा खुन करणारे आरोपीतांचा छडा लागल्याने साक्षी ग्रोवर हिला २५ फेब्रुवारी २०२४ रोजी अटक करून तपास करण्यात आला. ति सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात बंदीवासात आहे.



विनय पुणेकर यांच्या खुन करणारा आरोपी हेमंत रामनरेश शुक्ला याने खुन केल्यापासुन तो फरार होता त्याचा शोध दरम्यान तो पोलीसांची दिशाभुल करण्याकरीता वेगवेगळे मोबाईल नंबर तसेच दुस-यांचे मोबाईल फोनचा वापर करीत असल्याने तसेच तो वेळोवेळी स्वतःच्या शरीराची ठेवण बदलवून लोकेशन बदलवीत असल्याने मिळुन येत नव्हता. प्राप्त माहितीचे आधारे त्याचा शोध घेण्याकरीता सदर पोलीसांनी अथक परिश्रम करून वेगवेगळया टिम तयार करून रायपुर, मैहर, सतना, वाराणसी, दिल्ली, हरियाणा या ठिकाणी वारंवार शोध घेतला असता, तो मिळुन येत नव्हता. सदर पोलीसांनी त्याचा शोध घेण्याकरीता सचोटीने अथक प्रयत्न करून आपले बुध्दीकौशल्याने त्याचे ठिकाणाचा पत्ता शोधून काढला असता तो लुधीयाना येथे मिळून आल्याने त्यास ताब्यात घेण्यास पोलीसांना यश मिळून आले. हेमंत रामनरेश शुक्ला यास लुधीयाना पंजाब राज्य येथील न्यायालयात ट्रान्झीस्ट रिमांडकामी हजर करून त्यास गुन्हयाचे पुढील तपासकामी नागपूर येथे आणन्यात आले आहे.



अशा प्रकारे सदरची कारवाई ही पोलिस आयुक्त डॅा रविंद्र कुमार सिंघल,सहपोलिस आयुक्त अस्वती दोरजे,अपर पोलिस आयुक्त उत्तर विभाग प्रमोद शेवाळे,पोलिस उपायुक्त परी. २ राहुल मदने,सहा पोलिस आयुक्त सदर विभाग माधुरी बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन सदर मनिष ठाकरे, सपोनि. किशोरी माने, पोउपनि नारायण घोडके, पोउपनि निलेश घोगरे, पोउपनि. अभिजीत चिखलीकर, पो.हवा. अमोल दोंदलकर, पोहवा सतीष गोहत्रे पोहवा. रविन्द्र वैद्य, पोहवा. रविंद्र वैद्य, पोहवा. मोहन ठाकुर, संजय यादव, उल्हास राउत, हबिब सैयद, बालाजी, धनधान्य, पंकजवार,विशेष कामगिरी करणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष ठाकरे, पोउपनि अभिजीत चिखलीकर पो.हवा अमोल दोंदलकर पोना. प्रमोद क्षिरसागर, पोना. संजय यादव, पोशि विक्रम ठाकुर यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!