
‘ऑपरेशन कवच’अंतर्गत कारवाई; ३.३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
गांजा तस्करी करणारे दोन आरोपी अटक; ३ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त
परतवाडा (अमरावती):
ऑपरेशन कवच अंतर्गत अवैध धंद्यांवर आणि अमली पदार्थ तस्करीवर कडक कारवाई करण्याचे आदेश अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी दिले आहेत. या आदेशानुसार कारवाई करत परतवाडा पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने ३ लाख ३० हजार रुपये किमतीचा गांजा आणि मोटरसायकल जप्त केली असून दोन आरोपींना अटक केली आहे.

अटक करण्यात आलेले आरोपी:
१. रामनाथ मंगल बेलसरे (वय ४० वर्षे, रा. वस्तापुर, ता. चिखलदरा)
२. गणेश राजु झामरकर (वय ३८ वर्षे, रा. वस्तापुर, ता. चिखलदरा, जि. अमरावती)

-
वेळ व ठिकाण: २९ जुलै २०२५ रोजी दुपारी सुमारे २:०० वाजता.
-
गुप्त माहिती: स.पो.नि. सलीम शेख हे डीबी पथकासह पोलीस स्टेशन परतवाडा हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना, दोन इसम मोटरसायकलवरून (क्रमांक
MH 27 AY 7088) अंजनगाव रोडने परतवाडाकडे अमली पदार्थ गांजा विक्रीसाठी घेऊन जात असल्याची गुप्त माहिती मिळाली.
-
सापळा व अटक: माहिती मिळताच स.पो.नि. सलीम शेख व त्यांच्या पथकाने सरकारी पंचांसमक्ष अंजनगाव रोडवरील सावळी दातुरा गावाजवळील शेताजवळ पोलिसांच्या मदतीने सापळा रचला. अंजनगाव कडून येणाऱ्या संशयित मोटरसायकलला थांबवून दोन्ही इसमांना शिताफीने ताब्यात घेतले.
जप्त केलेला मुद्देमाल:
झाडाझडती दरम्यान आरोपींकडील पांढऱ्या रंगाच्या नायलॉनच्या कट्ट्यामध्ये गांजा आढळला.

-
गांजा (अमली पदार्थ): ५ किलो (किंमत ₹२५,०००/-)
-
वाहने: हिरो कंपनीची Splendor मोटरसायकल (किंमत ₹८०,०००/-)
-
एकूण जप्त मुद्देमाल: ₹३,३०,०००/- (सरकारी पंचांसमक्ष जप्त)
गुन्हा व पुढील कारवाई:
आरोपींवर NDPS Act (अमली पदार्थ विरोधी कायदा) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
कारवाई करणारे पोलीस पथक:
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक निकेतन कदम, मा. अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोडेवाड, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी धारणी माधवराव गरुड, स्था.गु.शा. पोलीस निरीक्षक अशोक लांडे, पोलीस निरीक्षक अजय आकरे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. सलीम शेख, पो.हे.कॉ. सचिन गोले, पो.हे.कॉ. सुधिर राऊत, पो.कॉ. शुभम शर्मा, पो.कॉ. चंदु वानखडे, पो.कॉ. सचिन कोकणे, पो.कॉ. घनश्याम किरोले आणि पो.कॉ. जितेश बाबील यांनी केली.




