
गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीस अकोट फाईल पोलिसांनी भुसावळ येथुन घेतले ताब्यात…
अकोट फाईल पोलिसांनी पो.स्टे. खदान येथील गुन्हयातील तिन
महीन्यापासुन फरार असलेले आरोपींना भुसावळ येथुन केली अटक…
अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.२०/०२/२०२४ रोजी अकोट फाईल अकोला पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहीतीचे आधारे मागील तिन महीनेपुर्वी पो.स्टे. खदान येथील अप.नं.६६२/२०२३ कलम १४३,१४७,१४८,१४९,२०१,३०७,,३२३,३२४,३२६, ५०४, ५०६ भा.द.वि. सहकलम ३ (१) (?) (s) ३(२) (v)३(२) (va) अ.जा.ज.कायदा सहकलम ४, २५ आर्म अॅक्ट चा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्हा दाखल झाल्यापासुन फरार असलेले आरोपी नामे १) सचिन मुकूंद बलखंडे,२) तुषार उर्फ चिकु आनंद लोंढे दोन्ही रा.पो.स्टे. अकोट फाईल हे लपुन भुसावळ येथे आहे.
अशी बातमी पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कडु पो.स्टे. अकोट फाईल अकोला यांना मिळाली,माहीतीची शहानिशा करून पो.नि. चंद्रशेखर कडु यांनी एक पथक तयार करून भुसावळ येथे रवाना केले, भुसावळ येथे पोहचल्यावर नेमलेल्या पथकांनी योग्य सापळा रचुन मिळालेल्या माहीतीवरून शिताफीने दोन्ही आरोपींना ताब्यात घेवुन अकोला येथे परत आणले. आरोपी नामे सचिन मुकूंद बलखंडे वय २५ वर्ष रा. शंकरनगर अकोट फाइल अकोला याचेवर पो.स्टे. अकोट फाईल अकोला येथे ०८ गुन्हे दाखल असुन आरोपी नामे तुषार उर्फ चिकु आनंद लोंढे वय २१ वर्ष याचेवर पो.स्टे. अकोट फाईल अकोला ०२ गुन्हे दाखल आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक बच्चन सिंग अपर पोलिस अधिक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सतिश कुलकर्णी, यांचे मार्गदर्शनाखाली अकोट फाईल पोलिस स्टेशनचे प्रभारी पो.नि. चंद्रशेखर कडु, पो.उप.नि. देविदास फुलउंबरकर, तसेच गुन्हे शोध पथकातील पो.हवा.संतोष चिंचोळकर, प्रशांत इंगळे, जितेंद्र कातखेडे,पोशि असलम शहा,गिरीश तिडके यांनी केली. पुढिल तपास उपविभागीय पोलिस अधिकारी शहर विभाग
करीत आहे.




