अवैध गुटख्याची साठवणुक करणाऱ्यावर सहा पोलिस अधिक्षकांचा छापा,गुटखा जप्त…
सहा पोलिस अधिक्षक यांचे पथकाचा आलेगांव येथील अवैध गुटखा विक्रेत्यावर छापा करवाई….
अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(१७) ॲागस्ट २०२४ रोजी दुपारी पोलिस अधिक्षक बच्चन सिंग यांचे मार्गदर्शनात सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी,बाळापुर गोकुळ राज जी. यांना गोपनीय माहीती मिळाली की आलेगाव येथील दुकानात महाराष्ट्रात प्रतिबंधित अशा सुंगंधीत तंबाखु/गुटखा ची अवैध साठवणुक करुन ठेवली आहे
अशा मिळालेल्या गोपनीय माहितीवरून, ठाणेदार रविंद्र लांडे, पोलिस स्टेशन चान्नी यांचें नेतृत्वात पोउपनी गजानन केदार, व पोलिस स्टेशन चान्नी येथील पोलिस पथक तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील पोलिस पथक व पोलिस स्टेशन पातुर येथील पोलिस पथक यांनी ग्राम आलेगांव येथे मिळालेल्या माहीतीवरुन अवैद्य गुटखा विक्री करणारा संदिप विलासराव देवकते, वय ३५ वर्षे रा. आलेगांव यांचे दुकाण व गोडाउन मध्ये गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ विक्री करीता साठवुण ठेवले असल्याचे निर्दशनात आले
त्यावर पंचासमक्ष छापा कारवाई करून दुकाण व गोडावुन मधुन तंबाखुजन्य पदार्थ ५०,३७८६/- रू, एक चारचाकी वाहन किमंत ५०००००/- रू, एक मोबाईल कि. १०,०००/- असा एकुन १०,१३७८६ चा मुददेमाल जप्त केला.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक बच्चन सिंग,अपर पोलिस अधिक्षक अभय डोंगरे,सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,बाळापुर गोकुल राज जी यांचे मार्गदर्शनात , ठाणेदार रविंद्र लांडे, पोलिस स्टेशन चान्नी यांचें नेतृत्वात पोउपनी गजानन केदार, पोशि सुनिल भाकरे, ज्ञानेश्वर गिते, राहुल वाघ, मपोशि उज्वला ईटीवाले,चालक सफौ संजय मात्रे उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय बाळापुर येथील पोलिस पथकातील पोहवा संतोष सोळंके, संतोष करंगळे, पोशि विठ्ठल उकिर्डे, गजानन शिंदे, योगेश चौधरी, स्वपनील वानखडे तसेच पोस्टे पातुर पोलिस पथकातील पोशि ईस्माईल, शंकर बोरकर, अंकुश राठोड, यांनी केली.